ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी निधन झाले. मृत्यूसमयी ते ७५ वर्षांचे होते. गोव्यातील मणिपाल रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांनी निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. पुण्यात शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नाना पाटेकर म्हणजे एक हरहुन्नरी नट. त्यांच्या स्वभाव पाण्यासारखा होता, ज्यात घालू तो त्यांंच्या भूमिकेचा रंग होत असे. हा माणूस खऱ्या अर्थाने प्रत्येक भूमिका जगला. भूमिका साकारण्याची त्यांची एक खास पद्धत होती. मराठी रंगभूमीही त्यांनी गाजवली. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी नाना पाटेकरांच्या आठवणी जागवल्या आहेत
वंदना गुप्ते नाना पाटेकरांबाबत काय म्हणाल्या?
नाट्यसृष्टीवर झालेला अचानक झालेला क्रूर हल्ला. नाना कुठेही येऊन अचानक धडकायचा. मला म्हणायचा तू माझ्याआधी नाटकात आलीस म्हणजे माझ्या आधी जन्माला आलीस का? मी म्हणायचे नाटकात आधी आले रे, जन्माला नाही. अशा आमच्या गप्पा रंगायच्या. नाना म्हटलं की पाटेकरच म्हणायचे लोक इतकी त्याने इंडस्ट्री व्यापून टाकली होती. नाना हा अभिनयाचा बादशहाच होता. नटसम्राट त्याला करायला मिळालं आहे म्हटल्यावर महेश मला म्हटला होता की नाना खूप खुश झाला आहे आणि रात्रंदिवस फक्त नटसम्राट या कॅरेक्टरचा विचार करतो आहे. महेश आणि मी तेव्हा बरोबर होतो. मला महेशने सांगितलं होतं की तो नाना त्याला कसं स्वगत कसं म्हणून दाखवल्याचं सांगितलं होतं.
नाना एकदम रोखठोक माणूस होता-वंदना गुप्ते
नाना रोखठोक माणूस होता, त्याला काम जमणार नसेल तर हातच लावणार नाही. पण जर एखादं काम हाती घेतलं तर ते तडीस नेणारच असा त्याचा स्वभाव होता. अगदी सामाजिक काम असेल तरीही हमखास उडी मारायचा आमचा नाना. मला फक्त इतकंच वाईट वाटतं की त्याच्याबरोबर काम करायची मला संधी मिळाली नाही. नानाचं पाठांतर तर अप्रतिम होतं. नानाला एक मच्छर कविता सुचली होती. किती साधी होती ती पण त्याला सुचली. मातीतला माणूस होता, मातीतला नट आज आपल्याला सोडून गेला आहे. अशी प्रतिक्रिया वंदना गुप्ते यांनी एबीपी माझाला दिली आहे.
मणिपाल रूग्णालयाच्या डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकर यांना मध्यरात्री २ वाजून ३० मिनिटांनी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मित्राला त्यासंदर्भात मेसेज केला होता. मात्र, रात्र असल्याने मित्राने मेसेज पाहिला नाही. मित्राने मेसेज पाहताच ते पहाटे चार वाजता नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तेव्हा नाना फरशीवर बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. त्यांनी तातडीने केअर टेकरला बोलावून रुग्णालयातून रुग्णवाहिका मागवली. रुग्णवाहिकेबरोबर त्यांचं वैद्यकीय पथकही निवासस्थानी दाखल झाले. वैद्यकीय पथकाने नानांना सीपीआर दिला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मणिपाल रुग्णालयात दाखल केले. तिथेही सीपीआर देण्यात आला. मात्र, डॉक्टरांनी ५ वाजून २० मिनिटांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी (कर्करोग) विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिली.
