Nana Patekar on Caste and Religion statements : लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. अभिनेते नेहमी त्यांची मतं, विचार आणि प्रितक्रिया ठामपणे मांडताना दिसतात. अशातच आता नुकत्यात एका कार्यक्रमामध्ये त्यांनी धर्म, जात याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 

नाना पाटेकर यांनी नुकतीच नागपुर येथील कार्यक्रमात हजेरी लावली. त्यांच्याबरोबर क्रेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेते मकरंद अनासपुरे आणि इतर अनेक ज्येष्ठ मंडळीसुद्धा उपस्थित होती. नागपुरातील या जलसंवादासंदर्भातील कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी त्याबद्दलही मतं मांडली. परंतु, याचदरम्यान त्यांनी मी माझी जात कधीच कोणाला सांगितली नाही असंही म्हटलं आहे. याचवेळी त्यांनी नटसम्राटबद्दलही सांगितलं आहे त्यांचे या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. नाना पाटेकरण नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात…

नाना पाटेकर नेमकं काय म्हणाले?

नाना पाटेकर कार्यक्रमात म्हणाले, “आमच्या आईला आम्ही नेहमी विचारायचो की मुस्लीम आणि हिंदू यांच्यामधील फरक काय आहे त्यावर ती म्हणायची काही नाही आपण होत जोडून नमस्कार करतो ते हात उघडून नमस्कार करतात. किता सोपी व्याख्या आहे ना दोन धर्मांमधली. आम्हाला लहानपणापासून हेच शिकवलंय त्यामुळे आम्हाला कधी तुझा धर्म कोणता, जात कोणती विचारावसंच वाटलं नाही.”

अभिनेते याबद्दल पुढे म्हणाले, “जात कधी संपणार नाही. तुम्ही संपल्या तरी त्या संपणार नाही. ऑफिसमध्ये बॉस राहणार. ती उच्च जात राहणार मग मध्ये दुसरी मग असं करत करत शेवटी शिपायाची. तर तुम्ही करता काय, तुमची पात्रता काय आहे त्याच्यावरुन आपली जात ठरते. कांबळी नावाचा आमचा बॉस मला आनंद होतो कांबळी माझा बॉस आहे. जातीचा फरक आपण शेवटी कसा मिटवणार आपल्या ज्ञानाने, शिक्षणाने. आज मोठ्या पदांवर इतकी छान मंडळी आहेत. त्यांची जात नाही कोणी विचारत. मला नाही कोणी विचारलं. तुम्हाला माहितीये का माझी जात. मी माझा जात नाही कधी कोणाला सांगितली आणि कोणी विचारलीही नाही.

दरम्यान, नाना पाटेकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ते अलीकडेच काही दिवसांपूर्वीच त्यांची ‘संकल्प’ ही सीरिज ओटीटीवर प्रदर्शित झाली. यासह ते बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूरच्या ‘ओ रोमिओ’ या चित्रपटातही झळकले.