अनन्या पांडेच्या घरी एनसीबीचे पथक दाखल; आर्यन खान प्रकरणाशी संबंध असण्याची शक्यता

एनसीबीने बुधवारी आर्यन खान आणि उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीचे ड्रग्ज चॅट कोर्टात सादर केले होते

Narcotics Control Bureau arrives at the residence of actor Ananya Pandey

एनसीबीचे पथक बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले आहे. मुंबईच्या वांद्रे येथील तिच्या घरात एनसीबीचे अधिकारी पोहोचले. या प्रकरणात अजून फारशी माहिती समोर आलेली नाही, पण असे मानले जाते की एनसीबीचा हा तपास आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित असू शकतो. अनन्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची मैत्रीण आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिम राबवण्यात येत आहे. त्यानंतर एनसीबीने अनन्या पांडेला चौकशीसाठी दोन वाजता कार्यालयात बोलावले आहे.

एनसीबीने बुधवारी आर्यन खान आणि उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीचे ड्रग्ज चॅट कोर्टात सादर केले होते. त्यामध्ये ड्रग्जबद्दल चर्चा झाली होती. या चॅटच्या आधारे एनसीबीने न्यायालयाकडे आर्यनसह उर्वरित आरोपींच्या रिमांडची मागणी केली आहे. अनन्या बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. अनन्याने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

२ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकल्यानंतर एनसीबीने प्रथम आर्यन आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले आणि नंतर त्यांना अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली आहे. आर्यन सध्या मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच, या प्रकरणात एक नवीन माहिती देखील समोर आली.

एनसीबीने आर्यनच्या ड्रगशी संबंधित व्हॉट्सअॅप चॅट कोर्टाच्या ताब्यात दिले आहे, ज्यात एका नवीन अभिनेत्रीसोबत ड्रग्सबद्दल संभाषण आहे.  ही अभिनेत्री त्यावेळी कोण होती, यावर कोणताही खुलासा झाला नाही.

एनसीबीची टीम शाहरुखच्या घरी

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची (एनसीबी) टीम शाहरुखच्या ‘मन्नत’ येथे पोहोचली आहे. गुरुवारी सकाळी शाहरुख तुरुंगात मुलगा आर्यन खानला भेटला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Narcotics control bureau arrives at the residence of actor ananya pandey abn

Next Story
Mumbai Drugs Case: अटकेमुळे आर्यन खानसमोर अडचणींचा डोंगर; ‘तो’ प्लॅनदेखील करावा लागला रद्द
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी