Nargis Fakhri Beauty Secret : आजच्या काळात काही जण स्लिम होण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग करतात, काही जण जिममध्ये तासनतास घाम गाळतात किंवा काही जण स्ट्रिक्ट डाएट करतात.

पण तुम्हाला माहिती आहे का की, एक अभिनेत्री वर्षातून १८ दिवस फक्त जॉलाइनसाठी अन्न खात नाही आणि फक्त पाण्यावर जगते.

हो, अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये अभिनेत्रीने खुलासा केला आहे की ती वर्षातून १८ दिवस अन्न खात नाही. हे जाणून सैफ अली खानची बहीण आणि अभिनेत्री सोहा अली खानला आश्चर्य वाटले.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘रॉकस्टार’मधील अभिनेत्री नरगिस फाखरी आहे. एका नवीन मुलाखतीत, नरगिसने तिच्या आरोग्याबद्दल आणि तंदुरुस्तीबद्दल सांगितले आहे. तिने हे देखील सांगितले की, ती वर्षातून दोनदा नऊ दिवस उपवास करते आणि या काळात ती फक्त पाण्यावर जगते.

हॉटरफ्लायच्या यूट्यूब चॅनेलवर सोहाशी झालेल्या संभाषणात नरगिसने खुलासा केला की, ती वर्षातून दोनदा नऊ दिवस उपवास करते आणि काहीही खात नाही, फक्त पाणी पिते. अभिनेत्री म्हणाली,” मी वर्षातून दोनदा उपवास करते, मी नऊ दिवस काहीही खात नाही, फक्त पाणी पिते. ते खूप कठीण आहे, पण एकदा मी उपवास केला की मी खूप सुंदर दिसते, म्हणजे जॉलाइन बाहेर येते, चेहरा चमकतो. मी ते शिफारस करणार नाही.”

आहारात करते ‘या’ गोष्टींचा समावेश

नरगिस फाखरी वयाच्या ४५ व्या वर्षीही स्वतःला इतकी तंदुरुस्त कशी ठेवते हे देखील तिने सांगितले. ती म्हणाली, “प्रत्येकाला लवकरात लवकर बरे व्हायचे असते, पण त्यावर कोणताही उपाय नाही. हे नेहमीच अनेक गोष्टींचे मिश्रण असते आणि माझ्यासाठी ते मिश्रण म्हणजे चांगली झोप. मी रात्री सुमारे आठ तास झोपते. मी हायड्रेटेड राहण्याचा देखील प्रयत्न करते. याशिवाय, माझ्याकडे अन्नाचे पर्यायदेखील आहेत. जसे की, मला पौष्टिक आणि जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेले अन्न खायचे आहे.”

नरगिस फाखरीने २०११ मध्ये ‘रॉकस्टार’ या चित्रपटातून पदार्पण केले. ती ‘मद्रास कॅफे’, ‘मैं तेरा हिरो’, ‘किक’, ‘स्पाय’, ‘हाऊसफुल ३’ आणि ‘हाऊसफुल ५’ मध्येही दिसली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.