ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतरच्या दुःखातून महाराष्ट्र सावरत असतानाच आणखी एक दुःखद वार्ता आली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे. अभिनेते जयवंत वाडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली. राजेश पिंजाणी यांच्या अकाली एक्झिटनंतर मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांच्या निधनानंतर जयवंत वाडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, ‘राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश पिंजानी यांचं तीव्र हृदयविकाराचा झटक्यामुळे निधन झालं आहे. ते आज आपल्यासोबत नाहीत ही दुःखद घटना आहे.’

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती

राजेश पिंजाणी यांना ‘बाबू बँड बाजा’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी सामान्य माणसाच्या जगण्यातलं दु:ख मांडलं होतं. या चित्रपटात एका बॅन्डवाल्याचे आयुष्य नाही तर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा आरसाच आपल्याला पाहायला मिळाला. या चित्रपटासाठी त्यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

दरम्यान नवीन वर्षाच्या सुरुवातीला राजेश पिंजाणी यांनी शेअर केलेली पोस्ट त्यांची अखेरची सोशल मीडिया पोस्ट ठरली. या पोस्टमध्ये त्यांनी २०२१ ला निरोप देत २०२२ चं स्वागत केलं होतं. ‘गुड बाय आणि वेलकम’ असं कॅप्शन असलेली त्यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.