नाना पाटेकर यांच्या लोकप्रिय ठरलेल्या भूमिकांपैकी एक म्हणजे त्यांची ‘नटसम्राट’ चित्रपटातील भूमिका. यामध्ये त्यांच्याबरोबर मेधा मांजरेकर यांनी काम केलं होतं. आज नाना पाटेकरांच्या अकाली निधनानंतर त्यांनी पोस्ट शेअर करत त्यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव सांगत नाना पाटेकर फक्त कलाकार म्हणूनच नाही तर माणूस म्हणूनही खूप चांगले होते असं म्हटलं आहे.

मेधा मांजरेकर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत नाना पाटेकर यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मेधा मांजरेकर म्हणाल्या, “ते आमचे नाना होते. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्य. नाना पाटेकरांना सादरीकरण करताना पाहणं म्हणजे फक्त एका अभिनेत्याला पाहण्यासारखं नव्हतं तर त्यांच्यामुळे त्या कलेबद्दल, माणसांबद्दल आणि आयुष्याबद्दलही खूप गोष्टी नव्याने कळायच्या.”

कर्करोगाच्या प्रवासात नाना पाटेकर करायचे मेधा यांची विचारपूस

नानांबद्दल मेधा पुढे म्हणाल्या, “पण ते किती मोठे अभिनेते होते याहीपेक्षा ते किती चांगले व्यक्ती होते हे माझ्या कायम लक्षात राहणार आहे. ते मला सरकार म्हणायचे. जेव्हा ते मला हाक मारायचे तेव्हा ते मला सरकार म्हणायचे. ते म्हणायचे सरकार कशा आहात आणि ते कधीच फक्त औपचारिकतेसाठी नाही विचारायचे तर ते मनापासून काळजीपूर्वक विचारायचे.” पुढे मेधा यांनी त्यांना कर्करोग झाल्यानंतरही नाना यांनी विचारपूस केली होती याबद्दल सांगितलं आहे. मेधा याबद्दल म्हणाल्या, “माझ्या कर्करोगाच्या प्रवासात नाना पाटेकर मला फोन करायचे आणि माझी विचारपूस करायचे. त्यांनी मला २० दिवसांपूर्वीच फोन केला होता आणि पुन्हा पहिल्यांदा त्यांनी काही विचारलं असेल तर सरकार कशा आहात?”.

मेधा मांजरेकर पुढे म्हणाल्या, “मला काहीच कल्पना नव्हती की त्यांचे ते शब्द शेवटचे ठरतील. लोक नाना पाटेकरांना नटसम्राट म्हणून ओळखतील. एक उत्कृष्ट अभिनेते, एक दमदार आवाज, जे प्रत्येक पात्र प्रामाणिकपणे करायचे. मलासुद्धा ते या सगळ्यासाठी आठवत राहतील. पण यापलीकडे जाऊन मला ते एक माणूस म्हणून आठवतील जे मला प्रमाणे सरकार कशा आहात असं विचारायचे. नाना तुम्ही मला खूप साऱ्या आठवणी दिल्या ज्या मी आयुष्याभर जपेन. तुम्ही कायम आमचे नटसम्राट राहाल. ओम शांती.”

दरम्यान, नाना पाटेकर यांच्या अकाली निधनानंतर मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, माध्यमांना प्रतिक्रिया देत त्यांनी नाना पाटेकर यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला आहे.