होळी सण कोळीबांधवांसाठी आनंदाचा, हर्षाचा दिवस. या सणाला कोळीबांधवांमध्ये विशेष महत्व असून हा दिवस उत्साहात साजरा करण्यावर या साऱ्यांचा भर असतो. या दिवशी कोळी बांधव आणि महिला पारंपारिक पद्धतीने होळीचं दहन करतात त्यासोबतच रंगपंचमीदेखील तितक्याच उत्साहाने साजरी करतात. त्यामुळे कोळीवाड्यातील ही धम्माल मस्ती पाहण्यासाठी ‘नवरा असावा तर असा’ची संपूर्ण टीम वरळी कोळीवाड्यात पोहोचली असून येथे या शोचा एक भाग रंगला आहे.

‘नवरा असावा असा’च्या हर्षदा खानविलकर वरळी कोळीवाड्यात पोहोचल्या असून त्यांनी येथील कोळीबांधवांसह हा सण साजरा केला आहे. हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

होळी हा सण कोळीबांधवांसाठी सर्वात मोठा सण असतो. या सणानिमित्त महिला आणि पुरुष खास पारंपारिक पोशाख परिधान करतात तसेच होळी कशाप्रकारे साजरी केली जाते ते देखील कोळी बांधवांनी सांगितल्याचं हर्षदा यांनी सांगितले. त्यासोबतच रंगपंचमी देखील तितकीच खास असते. रंगपंचमीसाठी रंगाची उधळण न करता मज्जेदार खेळदेखील खेळण्यात आले आहेत. तेव्हा नवरा असावा तर असा या कार्यक्रमाचा हा विशेष भाग नक्की बघा कलर्स मराठीवर.