Navya Naveli Nanda Big Statement on Rs 31,000 cr Escorts: नव्या नवेली नंदा अमिताभ बच्चन यांनी लेक श्वेता बच्चन व उद्योगपती निखिल नंदा यांची मुलगी आहे. नव्या लोकप्रिय असली तरी ती सिनेविश्वापासून दूर आहे. तिला वडिलांप्रमाणेच व्यवसायात रस आहे. तिचे वडील निखिल नंदा हे ३१,००० कोटी रुपये व्हॅल्यू असलेल्या ‘एस्कॉर्ट्स कुबोटा’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. नव्याने तिची ओळख फक्त मुलगी, नात किंवा बहीण म्हणून राहू नये, असे म्हणत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा संकल्प बोलून दाखवला.

भारतीय स्टेट बँकेच्या माजी अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांच्या ‘इंडॉमिटेबल’ या आत्मचरित्राच्या ‘अपराजिता’ या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात नव्या बोलत होती. आयआयएम अहमदाबादमधून दोन वर्षांचे एमबीए पूर्ण केलेल्या नव्याने कौटुंबिक नावाचा वारसा जपण्याच्या जबाबदारीवर भाष्य केलं. ती म्हणाली, “प्रत्येकाला एक आडनाव असते आणि त्या नावाला साजेसे काम करण्याची समान जबाबदारी प्रत्येकावर असते.”

ओळख नात्यापुरती मर्यादित राहू नये- नव्या नवेली नंदा

आपल्या आडनावाची जी ओळख आहे, त्याला कदाचित पूर्णपणे न्याय देऊ शकणार नाही, हे नव्याने मान्य केलं. पण आपल्या कामातून आणि आयुष्यातून तसा प्रयत्न करणार असल्याचं तिने सांगितलं. “माझी ओळख फक्त माझ्या आडनावापुरती किंवा मुलगी, नात, मैत्रीण किंवा बहीण म्हणून मी बजावतेय त्या भूमिकेपुरती मर्यादित राहावी अशी माझी अजिबात इच्छा नाही,” असं नव्याने स्पष्ट केलं.

Navya Naveli Nanda Surname Reality
नव्या नवेली नंदा (फोटो- इन्स्टाग्राम)

कुटुंबातील कर्तबगार महिलांचा केला उल्लेख

आई, बहीण किंवा गृहिणी या पलीकडे महिलांचं स्वतंत्र अस्तित्व असतं, यावर नव्याने भर दिला. तिला आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. यासाठी कुटुंबातील महिलांचा तिला नेहमीच पाठिंबा मिळाला. कुटुंबातील कर्तबगार महिलांचा तुझ्या प्रवासावर किती प्रभाव पडला? असं विचारल्यावर तिची आजी जया बच्चन, आई श्वेता बच्चन नंदा आणि तिच्या वडिलांची आई म्हणजेच दिवंगत आजी रितू नंदा यांचा आवर्जून उल्लेख केला.

Navya Nanda Career and Business
नव्या नवेली नंदा व तिचे वडील निखिल नंदा (फोटो- इन्स्टाग्राम)

“माझ्या आजीची महत्त्वाकांक्षा, तिची ताकद आणि तिने तिच्या तरुणपणी केलेली कामे बघत मी मोठी झाले, त्यामुळेच आज मी या मंचावर बसून हे तुमच्याशी बोलू शकतेय,” असं नव्या म्हणाली. दरम्यान, नव्या नंदा फक्त एस्कॉर्ट्स कुबोटामध्येच काम करत नाही तर महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या ‘आरा हेल्थ’ (Aara Health) या प्लॅटफॉर्मची सह-संस्थापक आहे. त्याचबरोबर तिने ‘प्रोजेक्ट नवेली’ (Project Naveli) नावाची एनजीओ सुरू केली आहे.

Navya Naveli Nanda speaking about Bachchan surname and career
नव्या नवेली नंदा, तिची आजी जया बच्चन, आई श्वेता बच्चन व मामा अभिषेक बच्चन (फोटो- इन्स्टाग्राम)

निखिल नंदा नव्याबद्दल काय म्हणाले होते?

यापूर्वी तिचे वडील निखिल नंदा यांनी आडनावामुळे कंपनीत नव्याला कोणतेही पद मिळणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. “भारतातील बाजारपेठ आणि गुंतवणूकदार हे कंपन्यांच्या कारभाराचा इतिहास ओळखण्यात खूप हुशार आहेत. कारण शेवटी, प्रत्येक गोष्टीचा परिणाम कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीवर दिसून येतो. आता नव्या नंदाला एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीच्या कामात जास्त रस आहे आणि तिला त्यात सहभागी व्हायची इच्छा आहे, पण फक्त तिचं आडनाव बच्चन आणि नंदा आहे म्हणून तिला कंपनीत पद मिळणार नाही, तर तिला ते पद स्वतःच्या कष्टाने आणि पात्रतेने कमवावे लागेल,” असं निखिल नंदा म्हणाले होते.