scorecardresearch

अमिताभ बच्चन यांच्या ‘या’ खास गोष्टीवर नात नव्या नंदाची नजर, म्हणाली…

हा फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना पुन्हा कामाला सुरुवात केल्याचे सांगितले आहे.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहणं बिग बींना चांगलंच आवडतं. सोशल मीडियावर सक्रीय राहून बिग बी तरुण पिढीला चांगलीच टक्कर देत असतात. नुकतंच अमिताभ बच्चन यांनी त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. बिग बींचा हा फोटो पाहून त्यांची नात नव्या नवेली नंदा हिने त्यांच्याकडे एक मागणी केली आहे. त्यामुळे सध्या या फोटोची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक कोलाज फोटो शेअर केला आहे. यात त्यांनी काळ्या रंगाची पँट, त्याच रंगाचा मास्क आणि शूज परिधान केले आहेत. विशेष म्हणजे यासोबत त्यांनी पांढऱ्या रंगाचा हुडी परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना पुन्हा कामाला सुरुवात केल्याचे सांगितले आहे. या फोटो त्यांनी हटके कॅप्शनही दिले आहे. परत कामाला सुरुवात…मास्क घाला, सॅनिटाईज करा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि लस घ्या, असे आवाहन त्यांनी या पोस्टद्वारे केले आहे.

अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर त्यांची नात नव्या नवेली नंदा हिने कमेंट करत अनोखी मागणी केली आहे. ‘मला ही हुडी मिळेल का?’ अशी मागणी नव्याने केली आहे. नव्या नवेलीच्या या कमेंटवर अनेक युजर्सने हटके प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील एका नेटकऱ्याने म्हटले की, सर तर तुमचे स्वत:चे आहेत आणि तुम्ही हुडी मागत आहात. तर दुसर्‍या यूजरने ‘तुम्हाला फक्त हुडीची गरज आहे, जा आणि मागा.’ असा सल्ला तिला दिला आहे. त्यामुळे सध्या अमिताभ यांचा हा फोटो आणि नव्याची कमेंट प्रचंड चर्चेत असल्याचे दिसत आहे.

‘बुट्टा बम्मा’ गाण्यामुळे चर्चेत आलेला अल्लू अर्जुनचा ‘तो’ चित्रपटही हिंदीत येणार; प्रदर्शनाची तारीखही ठरली

अमिताभ बच्चन हे काही महिन्यांपूर्वी इमरान हाश्मीसोबत ‘चेहरे’ चित्रपटात झळकले होते. त्यानंतर आता अमिताभ ‘ब्रह्मास्त्र’, ‘रनवे 34’, ‘गुडबाय’, ‘झुंड’ आणि ‘द ईस्टर्न’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करताना दिसत आहेत. सध्या या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Navya naveli nanda wants grandfather amitabh bachchan hoodie and fans reacted comment viral nrp

ताज्या बातम्या