नवाजुद्दीन सिद्दीकी दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत पदार्पणासाठी सज्ज; या दिग्गज कलाकारांबरोबर करणार काम | nawazuddin siddiqui is all set for his telugu film debuet with venkatesh and naga chaitanya | Loksatta

नवाजुद्दीन सिद्दीकी दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत पदार्पणासाठी सज्ज; या दिग्गज कलाकारांबरोबर करणार काम

नवाजुद्दीन आता दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवणार आहे

nawazuddin siddiqui telugu movie
फोटो : सोशल मीडिया

नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी एक आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. देशात आणि जगात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर नवाजुद्दीन आता दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याने शनिवारी सुपरस्टार व्यंकटेश यांच्याबरोबरचा तेलुगू डेब्यू चित्रपट ‘सैंधव’ची घोषणा केली आहे.

नवाजुद्दीनने ट्विटरवर याचे काही फोटोज शेअर करत त्याच्या चाहत्यांना या ही बातमी दिली आहे. शैलेश कोलानू दिग्दर्शित या चित्रपटात नवाजुद्दीनसह राणा डग्गुबती आणि नागा चैतन्यदेखील दिसणार आहेत. पहिल्या फोटोत नवाजुद्दीन चित्रपटाच्या सेटवर व्यंकटेश, राणा दग्गुबती आणि नागा चैतन्य आणि इतरांसह पोज देत आहे. तर शेवटच्या फोटोमध्ये नवाज भगवान हनुमानाच्या फोटो फ्रेमसमोर प्रार्थना करताना दिसत आहे.

आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवर फक्त ‘पठाण’चा डंका! तब्बल २० रेकॉर्ड्स मोडीत काढत किंग खानचा जबरदस्त कमबॅक

ही पोस्ट शेअर करताना नवाजुद्दीन सिद्दीकीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सर्वात उत्साही व्यक्ती असलेल्या व्यंकटेश दग्गुबतीच्या ७५ व्या चित्रपट ‘सैंधव’मध्ये काम करण्यास मी खूप उत्सुक आहे.” या चित्रपटाची निर्मिती शैलेश कोलानू करत आहेत. तेलुगुमध्ये पदार्पण करण्याच्या दिशेने. नुकताच शैलेशने नवाजुद्दीनबरोबरचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्याबरोबर त्याने लिहिले की, “आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक नवाजुद्दीन सिद्दीकीला आपल्या चित्रपटात घेण्याचा एक वेगळाच आनंद आहे. हा चित्रपट लोकांना वेड लावेल, मी तुम्हाला याची खात्री देतो.”

‘सैंधव’ हा एक पॅन इंडिया अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे ज्यामध्ये व्यंकटेश मुख्य भूमिकेत आहेत. निहारिका एंटरटेनमेंट या बॅनरखाली वेंकट बोयनपल्ली यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. याचं संगीत संतोष नारायणन यांनी दिले आहे. मात्र, नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात कोणती भूमिका साकारणार आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 19:51 IST
Next Story
Video : ‘पठाण’ चित्रपट सुरू असतानाच चाहत्यांनी थिएटरमध्येच फोडले फटाके अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल