scorecardresearch

नवाजुद्दीनच्या बॉडीगार्डने चाहत्यांबरोबर केलं असं काही की अभिनेताही भडकला, पाहा हा VIDEO

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या सुरक्षारक्षकांनी त्याच्याच चाहत्यांना चुकीची वागणूक दिलेल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

actor nawazuddin siddiqui video, nawazuddin siddiqui viral video
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या सुरक्षारक्षकांनी त्याच्याच चाहत्यांना चुकीची वागणूक दिलेल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

बॉलिवूडमधील टॉप कलाकारांच्या यादीमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचं नाव आवर्जुन घेतलं जातं. आपल्या बोलक्या अभिनयामुळे नवाजुद्दीन सिद्दीकी नावारुपाला आला. त्याने रुपेरी पडद्यावर साकारलेली प्रत्येक भूमिका कौतुकास्पदच आहे. शिवाय वेबसीरिज माध्यमामध्येही नवाजुद्दीनने आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नवाजुद्दीनमधील साधेपणामुळे प्रेक्षकांना तो आपल्यातला वाटतो. इतकंच नव्हे तर त्याचे लाखो चाहते आहेत. चाहत्यांचं आपल्यावर असलेल्या प्रेमाचा नवाजुद्दीन नेहमीच आदर करताना दिसतो. नुकताच नवाजुद्दीनचा एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नवाजुद्दीन एका इमारतीमधून बाहेर पडत असताना त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी केली होती. तो बाहेर येताच सगळ्यांनी त्याच्याबरोबर फोटो काढण्यास सुरुवात केली. पण नवाजुद्दीनच्या सुरक्षारक्षकांनी चाहत्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांचं हे कृत्य त्याच्या अजिबात पसंतीस पडलं नाही.

नेमकं काय घडलं?
नवाजुद्दीन इमारतीमधून बाहेर येताच सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. मात्र सुरक्षारक्षक त्यांना हाताने बाजूला करत होते. तसेच धक्का देऊनही काही जणांना बाजूला करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपल्याच चाहत्यांना दिलेली ही वागणूक नवाजुद्दीनला अजिबात आवडली नाही. त्याने सुरक्षारक्षकांचा हात बाजूला करत चाहत्यांना स्वतःबरोबर सेल्फी घेऊन दिला.

आणखी वाचा – “हिंदी चित्रपट साऊथमध्ये डब करा, तुम्हाला कोणी थांबवलंय?”, श्रेयस तळपदेचा सवाल

नवाजुद्दीनचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नवाजुद्दीन आपल्या चाहत्यावर्गाला किती महत्त्व देतो हे या व्हिडीओमधून स्पष्टपणे दिसून येत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनीही त्याचं कौतुक करण्यास सुरुवात केली. नवाजुद्दीन अभिनेता म्हणून जितका समृद्ध आहे तितकाच माणूस म्हणून देखील उत्तम आहे. याचा प्रत्यय त्याच्याकडे पाहून आपल्याला येतोच.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nawazuddin siddiqui stop his bodygaurd as he tried to push away a fans who was taking selfie with the actor kmd

ताज्या बातम्या