टायगरच्या ‘हीरोपंती २’ मध्ये खलनायकाची भूमिका साकारणार नवाजुद्दीन सिद्दीकी?

२०१४ मध्ये ‘हीरोपंती’ या चित्रपटातून टायगरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता यंदाच्या वर्षी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे.

(Photo Credit : Tiger Shroff Instagram and Nawazuddin Siddiqui Instagram)

बॉलिवूडचा अॅक्शन हीरो टायगर श्रॉफने ‘हीरोपंती’ या चित्रपटांतून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. आता या चित्रपटाचा दुसरा पार्ट ‘हीरोपंती २’ येणार आहे. या चित्रपटाबद्दल आणखी एक माहिती समोर आली आहे. या चित्रपटात आणखी एका अभिनेत्याची एण्ट्री होणार आहे. तो अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नाही तर नवाजुद्दीन सिद्दीकी आहे.

‘हीरोपंती २’ या चित्रपटात नवाजुद्दीन खलनायकाची भूमिका साकारणार आहे. गेल्या वर्षी ‘हीरोपंती २’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाच्या काही भागाचं चित्रीकरण हे  यंदाच्या वर्षी होणार होतं. मात्र, महाराष्ट्रात करोना व्हायरसचे संक्रमण थांबवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधांमुळे या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली नाही. या नंतर या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुन्हा एकदा सुरुवात होईल. दरम्यान, चित्रपटाचा काही भाग हा या आधीच शूट झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हीरोपंती’ या चित्रपटात टायगरसोबत क्रिती सेननने मुख्य भूमिका साकारली होती. आता अभिनेत्री तारा सुतारिया ‘हीरोपंती २’ मध्ये दिसणार आहे. टायगरने या वर्षी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलल्याचे सांगितले . ‘हीरोपंती २’ हा चित्रपट ३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या आधी हा चित्रपट १६ जुलै रोजी प्रदर्शित होणार होता.

टायगर श्रॉफच्या ‘बागी २’ आणि ‘बागी ३’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या अहमद खान हीरोपंती २ चे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करत आहेत.

आणखी वाचा : “आता फक्त हेच बाकी राहिलं होतं,” समलैंगिक असल्याच्या अफवांवर जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया

‘हीरोपंती २’ चित्रपटापूर्वी टायगर आणि नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या आधी टायगरचा ‘बागी ३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘हीरोपंती २’ नंतर टायगर ‘बागी ४’ आणि ‘गणतप’ आणि ‘रैंबो’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nawazuddin siddiqui to play villain role in tiger shroff film heropanti 2 dcp

ताज्या बातम्या