scorecardresearch

“तिने पहिल्या पतीबरोबर…” नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वकिलांनी अभिनेत्याच्या पत्नीवर केले खळबळजनक आरोप

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे वर्सोवा पोलिसांनी आलियाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

nawaz
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने गेल्या काही वर्षात अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये दिसला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. बॉलिवूडमधील गोष्टींवर तो कायमच आपली रोखठोक मतं मांडत असतो. सध्या तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याच्या आईने त्याच्या पत्नीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यावर यावर नवाझच्या पत्नीने अभिनेत्यावर आरोप केले होते आता या प्रकरणाला आणखीन एक नवे वळण मिळाले आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीचे वकील नदीम जफर जैदी आणि राष्ट्रीय हिंदू-मुस्लिम एकता मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष रिहान खान यांनी अभिनेता आणि त्याची पत्नी यांच्यातील भांडणावर भाष्य करण्यासाठी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. आलियाने यापूर्वी अभिनेता आणि त्याच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. दरम्यान, नवाज आपल्या घरातून बाहेर पडला असून एका हॉटेलमध्ये राहत आहे.

नदीम यांनी आरोप केला आहे की, “आलियाने अद्याप तिचा पहिला पती विनय भार्गव याला घटस्फोट दिलेला नाही. ती विवाहित असताना तिने नवाजुद्दीनसोबत लग्न केले. २००१ मध्ये आलिया उर्फ अंजली कुमारी, जी ८वी नापास आहे. हिने विनय भार्गवशी लग्न केले. त्यानंतर ती मुंबईत आली आणि अंजना पांडे बनली, त्यानंतर २०१० मध्ये अंजना आनंद बनली. त्यानंतर ती झैनब झाली आणि तिने इस्लाम धर्म स्वीकारला. त्यानंतर तिने नवाजुद्दीनशी लग्न केले आणि २०११ मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. पण जेव्हा नवाजुद्दीनचे करिअर जोरात चालू झाले तेव्हा ती पुन्हा आलियाच्या रुपात त्याच्या आयुष्यात आली.”

नवाजुद्दीन सिद्दीकीवर पत्नीच्या वकिलांनी केले गंभीर आरोप; म्हणाले “७ दिवस तिला घरात…”

ते पुढे म्हणाले, “२०२० मध्ये तिने त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली ज्याचा काहीच अर्थ नाही कारण दोघे आधीच वेगळे झाले आहेत. तसेच आलियाने तिची जन्मतारीख खोटी सांगितली आहे कारण तिच्या मार्कशीटमध्ये १९७९ चा उल्लेख आहे, तर तिच्या पासपोर्टमध्ये १९८२ असा उल्लेख आहे. नदीम यांचे म्हणणे आहे की अंजनाने २००८-९ मध्ये राहुल नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमविवाह केला होता. दोघेही मुंबईतील गोरेगाव येथे एका फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते.”

Video: दुबईचा समुद्र, यॉट सफारी अन् बेली डान्स; नोरा फतेहीच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन

दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियाचे लग्न २००९ मध्ये झाले होते. या दोघांना शोरा नावाची एक मुलगी असून यानी नावाचा एक मुलगा देखील आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 17:02 IST