नवाजुद्दीन सिद्दिकी आणि त्याची पूर्व पत्नी आलिया सिद्दिकी यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. दोघांमधील वाद याआधी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. आलियाने नवाजुद्दीनवर गंभीर आरोप करत सासरच्यांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे म्हटले होते. यानंतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला, परंतु सध्या आलिया सिद्दिकीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा : Video : “नताशा दलालची हुबेहूब कॉपी”, ‘त्या’ मुलीला पाहून वरुण धवनचा उडाला गोंधळ, नेटकरी म्हणाले “जुडवा २…”
आलियाने सिद्दिकीने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नवाजची पत्नी वेगळ्याच कोणत्यातरी व्यक्तीबरोबर दिसत आहे. हा मिस्ट्री मॅन नक्की कोण आहे? याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. रोमॅंटिक गाणे जोडून आलियाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
आलियाचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिला जोरदार ट्रोल करीत आहेत. कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे की, “आता आम्हाला कळाले तू हे सर्व नाटक का सुरु केले होतेस…” त्याचवेळी दुसर्या युजरने “आता कळाले नवाज बरोबर होता त्याने अगदी योग्य केले” याबरोबरच काही युजर्सनी “तुमच्या मुलांना काय शिकवणार, इतक्या लवकर मुव्ह ऑन झालीस”, “मग नाटकं करायची काय गरज होती?” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या आहेत.
नवाजुद्दीन आणि आलियामध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. परस्पर संमतीनंतर अभिनेत्याने आलियावरील मानहानीचा खटलाही मागे घेतला असून सध्या दोघेही आपले वैयक्तिक आयुष्य जगत आहेत. दरम्यान, आलिया सध्या दुबईत असून, नवाजुद्दीन त्याच्या ‘जोगिरा सारा रा रा रा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiquis wife aaliya siddiqui trolled after her instagram reel with mystery man goes viral sva 00