scorecardresearch

“भूमिकेच्या बदल्यात त्यांनी…”, नयनताराने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

नयनताराने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

Nayanthara, nayanthara on casting couch, nayanthara on facing casting couch, Entertainment News, South Cinema News, नयनतारा, नयनताराने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव, विग्नेश शिवन
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लेडी सुपरस्टार नयनतारा सध्या बरीच चर्चेत आहे. नयनतारा लवकरच शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या आगामी चित्रपटाबद्दल नाही तर इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचच्या अनुभवांबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

करिअरच्या सुरुवातीच्या काळात नयनताराला कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता असं तिने या मुलाखतीत सांगितलं आहे. नयनताराने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, तिलाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. तिने आपल्या अनुभवाबद्दल बोलताना तिच्याबरोबर घडलेला एका प्रसंग सांगितला.

आणखी वाचा- “योग्य वेळीच…” नयनताराचा पती विग्नेशचे सरोगसीसह इतर चर्चांवर स्पष्ट शब्दात उत्तर

कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल बोलताना नयनतारा म्हणाली, “माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मला कास्टिंग काऊचच्या वाईट अनुभवांना सामोरं जावं लागलं आहे. एका चित्रपटात मुख्य भूमिका देण्याच्या बदल्यात माझ्याकडे निर्मात्याने काही मागण्या केल्या होत्या. अर्थात मी त्यांचा मागण्या पूर्ण केल्या नाहीत आणि त्या भूमिकेलाही नकार दिला.” दरम्यान अभिनेत्रीने संबंधित चित्रपट आणि निर्मात्याच्या नावाचा खुलासा केला नाही.

आणखी वाचा- नयनताराच्या घरी जुळ्या मुलांचा जन्म; पण तामिळनाडू सरकारने दिले चौकशीचे आदेश, कारण…

या मुलाखतीत नयनताराने तिचा पती आणि निर्माता विग्नेश शिवनचाही उल्लेख केला. त्याच्या प्रेमाने मला शांत केलं आणि आता मी माझ्या जीवनाबद्दल निश्चिंत आहे असंही ती म्हणाली. नयनतारा तिच्या आयुष्याबद्दल बोलताना म्हणाली, “मला आता कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही असं वाटतं. कोणी माझ्यावर टीका करत असेल किंवा कोणत्याही वाईट परिस्थितीत माझा नवरा माझ्याबरोबर असतो. त्यामुळे सर्व ठीक आहे असं वाटतं.” दरम्यान नयनताराच्या कामाबद्दल बोलायचं तर तिचा ‘कनेक्ट’ चित्रपट डिसेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता ती लवकरच ‘जवान’मध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 12:20 IST