आर्यन आणि अनन्यानंतर होणार या स्टारकिडची चौकशी; अभिनेत्याने केली भविष्यवाणी

अभिनेत्याने केलेले ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Aryan Khan,gauri khan, shanaya kapoor, ananya panday,Aryan Khan cried,Aryan Khan,gauri khan birthday,hrithik roshan, suhana khan, Shah Rukh Khan, Gauri Khan, Bollywood News, Shah Rukh Khan, Aryan Khan, NCB, Aryan Khan in news, Aryan Khan latest new, Aryan Khan updates, आर्यन खान, शाहरुख खान,

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून चौकशी सुरु आहे. एनसीबीला अनन्या आणि सध्या तुरुंगात असलेला आर्यन खान या दोघांचे काही चॅट्स सापडले आहेत. त्यातून धक्कादायक खुलासे होत आहेत. दोन दिवस सतत अनन्याची चौकशी करण्यात आली आहे. आता बॉलिवूडमधील आणखी काही स्टारकिड्सची नावे समोर येण्याची शक्यता असल्याचे एका अभिनेत्याने म्हटले आहे.

अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट विश्लेषक कमाल आर खानने केलेले ट्वीट सध्या चर्चेत आहे. ‘जर आर्यन खान आणि अनन्या पांडे ड्रग्ज विषयी बोलले हे खरे असेल तर हा गुन्हा आहे. तसेच शनाया कपूरला देखील एनसीबीकडून चौकशीसाठी बोलण्यात येईल’ या आशयाचे ट्वीट केआरकेने केले आहे.
आणखी वाचा : मी तुझ्यासाठी गांजाची व्यवस्था करते; ‘त्या’ चॅटसंबंधी विचारल्यानंतर अनन्या NCBला म्हणाली, “मी तर मस्करी…”

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) तपासाची व्याप्ती वाढत आहे. एनसीबीचे एक पथक गुरुवारी सकाळी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी चौकशीसाठी पोहोचले आणि चार ते पाच तासांच्या चौकशीनंतर निघून गेले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अभिनेता अनन्या पांडेचा फोन ताब्यात घेतला आहे. गुरुवारी एनसीबीचे पथक तपासासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले होते. एनसीबीने अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी शोधमोहीम राबवली. अनन्याच्या घरातून शोध घेतल्यानंतर एनसीबीचे पथक शाहरुख खानच्या घरी मन्नत पोहोचले. अहवालानुसार, पथकाने अनन्याच्या घरातून काही वस्तू देखील घेतल्या आहेत. त्यानंतर आता आणखी एका स्टारकिडची चौकशी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncb may summon shanaya kapoor in aryan khan drug case krk tweet avb

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी