सध्या देशात ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट तुफान कमाई करत असताना चित्रपटावर मुस्लिमांबद्दल द्वेष पसरवल्याचा आरोपही केला जात आहे. हा चित्रपट जातीयवादी आणि विशिष्ट राजकीय विचारसरणीला प्रोत्साहन देण्यासाठी बनवला गेला आहे, असे आरोपही या चित्रपटावर होत आहेत. या वादादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या चित्रपटाबद्दल वक्तव्य केलं आहे. सत्तेतले लोक या चित्रपटाचं प्रमोशन करतायत हे दुर्दैव असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता विवेक अग्निहोत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर उत्तर दिले आहे.

यावर विवेक अग्निहोत्री यांनी एक ट्वीट करत उत्तर दिले आहे. “या व्यक्तीचे नाव विवेक रंजन अग्निहोत्री आहे. काही दिवसांपूर्वी जो तुम्हाला विमानात भेटला होता, त्याने तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला होता. त्यानंतर तुम्ही काश्मिरी हिंदूंच्या नरसंहारावर सर्वोत्कृष्ट चित्रपट बनवल्याबद्दल या व्यक्तीचे आणि त्याच्या पत्नीचे अभिनंदन केले.” असे ट्वीट विवेक अग्नीहोत्रींनी केले आहे.

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
What Ajit Pawar Said?
“द्रौपदीचा विचार करावा लागतो की काय?”, मुलींच्या जन्मदरावर बोलताना अजित पवार काय बोलून गेले?
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
dhairyasheel mane criticizes raju shetty
“पाठिंब्यासाठी दुसऱ्याच्या पायऱ्या का झिजवत आहेत?”, खासदार माने यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका

आणखी वाचा : अनुष्का शर्मा मराठमोळ्या जेवणाच्या प्रेमात, फोटो शेअर करत म्हणाली…

आणखी वाचा : आजीबाईंचा ‘चंद्रा’ गाण्यावर डान्स शेअर करत अमृता खानविलकरने मानले आभार, म्हणाली…

काय म्हणाले होते शदर पवार?

शरद पवार यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीविषयी ANI ने ट्वीट करत माहिती दिली. यात शरद पवार ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर निशाणा साधत म्हणाले, “एका माणसाने चित्रपट (द काश्मीर फाईल्स) बनवला असून त्यात हिंदूंवर होणारे अत्याचार दाखवले आहेत. या सिनेमात असं दाखवण्यात आलंय की बहुसंख्याक नेहमीच अल्पसंख्याकांवर हल्ले करतात आणि जेव्हा मुस्लीम बहुसंख्य असतात तेव्हा हिंदू समाज असुरक्षित होतो. सत्तेतील लोक या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत हे दुर्दैव आहे.”

आणखी वाचा : “दुश्मन…”, देवेंद्र फडणवीस यांना पाहून एकनाथ खडसेंनी गायलेल्या गाण्याची होतेय चर्चा

आणखी वाचा : राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांचा मुलगा ‘या’ चित्रपटातून करणार सिनेसृष्टीत पदार्पण

११ मार्च रोजी ‘द काश्मीर फाइल्स’ रिलीज झाला होता. त्यानंतर बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने एका महिन्यात सुमारे २५० कोटी रुपयांचा गल्ला केला आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.