मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन दिलाय. या सगळ्यांना मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात हा जामीन मिळाला आहे. या सुनावणीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. आर्थर रोड तुरुंगातून आर्यन आता मन्नतला पोहोचला. यावेळी गुरुवारी आर्यनला जामीन मिळाल्यापासून आर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर बरीच गुरुवार पासून लोकांनी गर्दी केली होती. आर्यन कधी बाहेर येणार आणि काय घडणार हे पाहण्यासाठी ही गर्दी होती. मात्र, काही लोकांना हे महागात पडलं आहे.

रिपोर्टनुसार, आर्यन आर्थर रोड तुरुंगात बाहेर येण्याआधी शुक्रवारी तुरुंगाच्या बाहेर असलेल्या लोकांनापैकी जवळपास १० लोकांचे फोन चोरीला गेले आहेत. याची माहिती लाइव लॉ इंडिया या ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे. त्याने एक ट्वीट करत ही बातमी दिली आहे. यात म्हटले आहे की, शुक्रवारी १० आर्थर रोड तुरुंगाच्या बाहेरून जवळपास १० फोन चोरीला गेले आहेत.

आणखी वाचा : रसिका सुनील अडकली लग्नबंधनात; सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती

आणखी वाचा : ‘लग्नाचा वाढदिवस विसरलो तर…’, जया बच्चन काय करतात अमिताभ यांनी केला खुलासा

दरम्यान, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानचा जामीन मंजूर केला होता. शाहरुखची मैत्रीण आणि अभिनेत्री जुही चावला शुक्रवारी संध्याकाळी २३ वर्षीय आर्यनच्या जामिनासाठी ड्रग्जशी संबंधित खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस कोर्टात हजर झाली. हायकोर्टाने शुक्रवारी आपल्या आदेशाचा मुख्य भाग उपलब्ध करून दिला ज्यामध्ये आर्यन खान आणि या प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यावर १४ अटी घालण्यात आल्या आहेत. तिघांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जामीनदारावर आणि तत्सम रकमेच्या दोन जामिनावर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.