छोट्या पडद्यावरील रिअ‍ॅलिटी शोमधून नव्या कलाकारांसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध होत असून त्यातून पाश्चिमात्य देशांच्या नृत्य कलेची जोपासना करण्याचे कार्य सुरू आहे. त्यामुळे आपल्या लोकनृत्य कलेचा लोप होत चालला आहे. त्या भारतीय लोकनृत्य कलेचा आपण वारसा जपला पाहिजे, अशी अपेक्षा सिनेसृष्टीतील नृत्य निर्देशक गणेश आचार्य यांनी शिर्डीत व्यक्त केली आहे.

शिर्डी साई दर्शनासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. या प्रसंगी साई संस्थानच्या वतीने विश्वस्त सचिन तांबे यांनी त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी आचार्य यांच्या मातोश्री पुष्पा आचार्य, पत्नी विधा आचार्य, कन्या सौंदर्या आचार्य, त्यांच्या नृत्य समूहाचे नृत्य गुरू संजीव हवालदार आदींचा सत्कार करण्यात आला.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

आचार्य म्हणाले, की मुळात छोट्या पडद्यावर भारतीय कलेला वाव दिला जात नाही. म्हणून मी कधी कोणत्याही शोसाठी गुरू म्हणून गेलो नाही. कारण मी स्वत:ला गुरू समजत नसून मी अजून नृत्य क्षेत्रात विद्यार्थी आहे. मला अजून भरपूर शिकायचे आहे. त्यामुळे मी कोणाचा गुरू होऊन त्यांना काय शिकवणार असे आचार्य यांनी सांगितले. तसेच ते म्हणाले, की गेली ३५ वष्रे झाली मी नृत्य क्षेत्रात कार्यरत आहे. या कालावधीत कामाच्या व्यापात कधीही कोणत्याही व्यसनाची लागण होऊ दिली. गणपती सरस्वती देवता असून मी त्याचा पुजक आहे. तर साईबाबा माझे दैवत आहे. मी साईंच्या दर्शनासाठी कित्येक वेळा पायी, सायकलस्वारी करून दर्शनाला आलो आहे. आतापर्यंत कोणतीही नृत्य अ‍ॅकॅडमी सुरू केलेली नाही. मी माझी अ‍ॅकॅडमी सुरू करेन ती सर्वप्रथम शिर्डीत अशी ग्वाही आचार्य यांनी दिली. सध्या आम्ही ‘गोट्या’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करीत आहोत. त्याचबरोबर आगामी काळात प्रेक्षकांसाठी भिकारी नावाचा एक उत्तम कथानक असलेले चित्रपट घेऊन येणार आहोत. त्या एका गाण्यासाठी ४० फुट गणपती बाप्पाची मूर्ती, ५०० नृत्य करणारे कलाकार यांचा समावेश असलेले गाणे तयार करण्यात येणार असल्याचे  आचार्य यांनी सांगितले. २०१८ ला साईबाबा समाधी शताब्दी वर्ष साजरे करणार असल्याची माहिती साई संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांनी गणेश आचार्य यांना दिली. त्यावर आचार्य यांनी सांगितले, की साईबाबा संस्थानने एक निरोप द्यावा व तारीख कळवावी. बाबांची सेवा म्हणून माझ्या वतीने समाधी शताब्दी वर्षांत एक सुंदर असा कार्यक्रम आपण सादर करू.