गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या चर्चेत आहेत. या चर्चा नीना यांच्या जीवनावर आधारित पुस्तक ‘सच कहूं तो’ प्रकाशित झाल्यामुळे सुरु झाल्या होत्या. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. पण सध्या नीना एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. या चर्चा नीना गुप्ता यांनी सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे सुरु झाल्या आहेत.

नीना गुप्ता यांनी १९८४ साली प्रदर्शित झालेला अडल्ड चित्रपट ‘उत्सव’मध्ये अभिनेते शंकर नाग यांच्यासोबत काम केले होते. या चित्रपटातील एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये नीना गुप्ता एकदम बोल्ड अंदाजात दिसत आहेत.

Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
supriya pilgaonkar praised swatantra veer savarkar movie
“१२ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी…”, सुप्रिया पिळगांवकरांची ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल पोस्ट; म्हणाल्या…
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

आणखी वाचा : ‘चोली के पीछे…’ गाण्याच्या वेळी सुभाष घई यांची मागणी ऐकून नीना गुप्ता यांना वाटली होती लाज

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

शंकर नाग यांच्यासोबतचा फोटो शेअर करत नीना गुप्ता यांनी ‘उत्सव चित्रपटातील एक सीन.. शंकर तुझी नेहमी आठवण येते. तू आम्हाला खूप लवकर सोडून गेलास’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. नीना यांच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.

१९८४ साली प्रदर्शित झालेला ‘उत्सव’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटात रेखा आणि शशी कपूर मुख्य भूमिकेत होते. तसेच अमजद खान, अनुपम खेर, नीना गुप्‍ता, सतीश कौशिक, शंकर नाग आणि अन्नू कपूर हे देखील चित्रपटात दिसले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरिश कर्नाड यांनी केले होते. शंकर नाग हे कन्नड चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी ‘मालगुडी डेज’चे दिग्दर्शन केले होते. पण वयाच्या ३६व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ३० सप्टेंबर १९९० रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.