तरुण अभिनेत्रींना पाहून माझा जळफळाट होतो- नीना गुप्ता

जाणून घ्या, नीना गुप्ता असं का म्हणाल्या…

neena gupta
नीना गुप्ता

अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या करिअरची ‘सेकंड इनिंग’ सध्या जोरात सुरु आहे. ‘बधाई हो’, ‘मुल्क’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या. सध्या त्यांच्याकडे आणखी चांगले प्रोजेक्ट हातात असूनही तरुण अभिनेत्रींना पाहून जळफळाट होत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्ता यांनी ही भावना व्यक्त केली.

त्या म्हणाल्या, “मला ज्या प्रकारच्या भूमिका सध्या मिळत आहेत, त्याने मी खूश आहे. मला असं वाटतं की जीवनात मला एक नवी वाट मिळत आहे. काम मिळत असल्यामुळे उत्साहपूर्ण आणि खूश असल्याची भावना मनात कायम असते. मात्र याचसोबत मी उदास आहे. मी तरुण असती तर बरं झालं असतं असं मला वाटतं. तरुण अभिनेत्रींना पाहून माझा जळफळाट होतो. खासकरुन ज्या अभिनेत्री खूप चांगलं काम करत आहेत.”

२०१७ मध्ये नीना गुप्ता यांनी सोशल मीडियाद्वारे कामाची मागणी केली होती. राष्ट्रीय पुरस्कार विजेती असूनदेखील मला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळत नाही, अशा आशयाची पोस्ट त्यांनी लिहिली होती. या पोस्टनंतर त्यांना काही चित्रपटांच्या ऑफर्सदेखील मिळाल्या. ‘बधाई हो’मधील त्यांनी साकारलेल्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. हाच चित्रपट टर्निंग पॉईंट ठरल्याचं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. जर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला असता तर मला पुढे काम मिळालं नसतं, असंही त्या म्हणाल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Neena gupta says she feels jealous of young girls ssv