“मी त्याचा तिरस्कार…” एक्स बॉयफ्रेंड विवियन रिचर्ड्सबद्दल नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा

नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स यांचं नातं एकेकाळी बरंच चर्चेत होतं.

“मी त्याचा तिरस्कार…” एक्स बॉयफ्रेंड विवियन रिचर्ड्सबद्दल नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा
नीना गुप्ता यांनी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्याशी एकेकाळी असलेल्या नातेसंबंधांवर मौन सोडलं.

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता सध्या खूप चर्चेत आहेत. त्या सोशल मीडियावर नेहमीच तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. अनेकदा त्यांचे व्हिडीओ व्हायरलही होताना दिसतात. नीना गुप्ता बॉलिवूड बेधडक अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात आणि त्या नेहमीच आपलं मत बिनधास्तपणे मांडताना दिसतात. आपल्या वक्तव्यावर लोक काय बोलतील याचा त्या फारसा विचार करत नाहीत. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी त्यांचा एक्स बॉयफ्रेंड आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्याशी एकेकाळी असलेल्या नातेसंबंधांवर मौन सोडलं आणि त्यांच्याबाबत बरेच खुलासे देखील केले.

‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्ता यांना या नात्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, “माझा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही एखाद्यावर एकदा प्रेम करता तेव्हा तुम्ही त्याचा तिरस्कार करू शकत नाही. तुम्ही जगू शकत नाही, तुम्ही एकत्र राहू शकत नाही. मी माझ्या एक्स बॉयफ्रेंडचा तिरस्कार करत नाही. मी माझ्या पूर्वश्रमीच्या पतीचा देखील तिरस्कार करत नाही. मी त्यांचा द्वेष का करू, जर एखादी व्यक्ती मला आवडत नसेल तर मी त्याच्या मुलाला जन्म कसा देऊ शकते? जर मी असं केलं तर मी त्या व्यक्तीचा तिरस्कार करत नाही असा त्याचा अर्थ होतो.”

आणखी वाचा- सोनाली कुलकर्णीच्या वेडिंग स्टोरीची पहिली झलक, पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

आणखी वाचा- “आताच्या अभिनेत्यांना तरुण अभिनेत्री हव्या आणि…” नीना गुप्ता असं का म्हणाल्या?

दरम्यान नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स १९८० च्या दशकात रिलेशनशिपमध्ये होते. विवियान यांच्यापासून नीना गुप्ता यांना एक मुलगी देखील आहे. विवियन यांनी नीना गुप्ता यांच्याशी लग्न केलं नाही मात्र १९८९ मध्ये नीना यांनी मसाबाला जन्म दिला. त्या नेहमीच विवियन रिचर्ड्स यांच्या संपर्कात होत्या. त्यावेळी विवियन यांचं लग्न झालं होतं त्यामुळे त्याने नीना यांच्यासाठी पत्नीला सोडण्यास नकार दिला होता. यानंतर नीना यांनी मसाबाला एकट्यानेच लहानाचं मोठं केलं. २००८ मध्ये नीना यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Neena gupta talk about his ex boyfriend and cricketer vivian richards mrj

Next Story
“असं पाहिजे नातं…” ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने संकर्षण कऱ्हाडेने श्रेयस तळपदेसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
फोटो गॅलरी