Video: ‘कपूर कुटुंबीयांना एक खोटा अहंकार आहे, पण…’, नीतू कपूर यांचा खुलासा

त्यांनी एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

neetu kapoor upar se rubaab hai andar se lallu, neetu kapoor says kapoors have fake arrogance, neetu kapoor rishi kapoor Riddhima Kapoor Sahni, neetu kapoor in the kapil sharma show,
नीतू कपूर यांचा शोमधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची पत्नी, अभिनेत्री नीतू कपूर सध्या चर्चेत आहेत. नुकताच त्यांनी छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा’मध्ये हजेरी लावली. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी रिद्धिमा देखील उपस्थित होती. दरम्यान या शोमध्ये नीतू यांनी वक्तव्य करत कपूर कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे.

सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘द कपिल शर्मा शो’मधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नीतू आणि कपिल शर्मा कपूर कुटुंबीयांविषयी बोलताना दिसत आहेत. त्यावेळी नीतू म्हणाल्या, ‘कपूर कुटुंबीयांमध्ये एक खोटा अहंकार आहे, कपूर अहंकारी आहेत. बाहेरुन रुबाब आणि आतून एकदम लल्‍लू आहेत.’ ते ऐकून रिद्धिमा आश्चर्यचकित होतो. तर कपिल आणि अर्चना पुराण सिंह यांना हसू अनावर होते.

आणखी वाचा : कपूर कुटुंबीयांनी आईकडे पाठ फिरवली होती, करीना कपूरचा खुलासा

आणखी एक व्हिडीओ सोनी वाहिनीने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कपिलने ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘आम्ही एका एपिसोडसाठी ऋषी कपूर यांना बोलवले होते. पण त्यांना सोबत नीतू कपूर यांना घेऊन या हे सांगलाय सागळे घाबरत होते’ असे कपिल बोलताना दिसत आहे.

पुढे कपिल म्हणाला ‘मी सरांना बोललो सर, नीतू यांना देखील बोलवायचे आहे.’ त्यावर उत्तर देत ऋषी कपूर म्हणाले होते, ‘तिला फोन करा, मला का फोन करत आहात?’ त्यानंतर कपिल म्हणाला की मी रात्री १० वाजता फोन केला आणि विचारले मॅडम, ऋषी कपूर तुमच्या सोबत नाहीत का? त्यावर मॅडम म्हणाल्या होत्या, माझे पती रात्री १० वाजता माझ्यासोबत नाही तर दुसरीकडे कुठे असणार? ते ऐकून सर्वांना हसू अनावर होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Neetu kapoor in kapil sharma shows says kapoors have fake arrogance upar se rubaab hai avb

ताज्या बातम्या