नेहाला मिळाला ‘हा’ धक्कादायक अनुभव

नेहाला लग्नानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चक्क सहाशे मेसेज आले होते.

neha dhupia
नेहा धुपिया

बॉलिवूडमधील एक एक करत साऱ्याच अभिनेत्री विवाहबंधनात अडकत असून काही दिवसापूर्वीच अभिनेत्री नेहा धुपियानेही तिच्या जोडीदाराची निवड केली. नेहाने अभिनेता अंगद बेदीशी लग्नगाठ बांधली असून तिच्या लग्नाच्या चर्चा अद्यापही शमलेल्या नाहीत. याच लग्नानंतर नेहाने एक अनुभव शेअर केला असून हा अनुभव तिला धक्का देणारा असल्याचं सांगण्यात येत आहे.

ज्येष्ठ क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांची सून झालेल्या नेहाला लग्नानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चक्क सहाशे मेसेज आले होते. सुरुवातीला एवढे मेसेज पाहून ते शुभेच्छांचे असतील असं नेहाला वाटलं होतं. मात्र प्रत्यक्षात हे मेसेज शुभेच्छांचे नसून तिच्यावर टीका करणारे होते. झालेल्या एका मुलाखतीमध्ये नेहाने तिचा हा अनुभव शेअर केला असून तिच्यासाठी हे फार अनपेक्षिक असल्याचं ती म्हणाली.

गुपचूप लग्न केलेल्या नेहाने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लग्नाची घोषणा केली होती. त्यामुळे साऱ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं. विशेष म्हणजे लग्नानंतर काही काळाने नेहाने तिचा फोन चेक केल्यावर त्यावर चक्क ६०० मेसेज येऊन पडले होते. या मेसेजमध्ये अनेकांनी तिच्यावर आरोप केले होते. तर काहींनी तिला अपशब्दही वापरले होते.

आमचं असं अचानक लग्न करणं साऱ्यांनाच धक्का देणारं होतं. मात्र लग्न करायचं हे मी आणि अंगदने आधीच ठरवलं होतं. अंगदला केवळ गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड याच नात्यात अडकायचं नव्हतं. त्याला या नात्याला एक नाव द्यायचं होतं. त्यामुळे आम्ही लग्नाचा निर्णय घेतला, असंही ती म्हणाली.
दरम्यान, नेहा लग्नापूर्वीच गरोदर असल्यामुळे तीने हे लग्न केल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र असं कोणतंच कारण नसल्याचं नेहाच्या वडीलांनी सांगितलं होतं. नेहाचं लग्न दिल्लीत शीख रितीरिवाजानुसार झालं आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Neha dhupia reveals what happened after marriage with angad bedi

ताज्या बातम्या