नेहाचा स्टेजवर धमाकेदार परफॉर्मन्स, पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ जुना आहे.

लाखो तरुणांच्या मनावर आपल्या मधूर आवाजाने जादू करणारी बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका म्हणून नेहा कक्कर ओळखली जाते. नेहाचे गाण्याच्या व्यतिरिक्त कॉमेडी आणि डान्स करतानाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर नेहाचा थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आहे.

एका फॅन पेजने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नेहा तिच्या आवाजात ‘चन्ना मेरेया’ हे गाणे गाताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील पाहण्यासारखे आहेत.

काही दिवसांपूर्वीच नेहाने यूट्यूबवर जगभरातील टॉप सिंगरला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली होती. या पोस्टमध्ये तिने जगभरात यूट्यूबवर सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या गायिकांची यादी शेअर केली आहे. या टॉप १० गायिकांच्या यादीमध्ये नेहा कक्कर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये गायिता Cardi Bने ४.८ बिलियन व्ह्यूज यूट्यूबर मिळाले असून तिने पहिले स्थान पटकावले आहे. तर नेहा कक्करला ४.५ बिलियन व्ह्यूज मिळाले असून ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. नेहाने कि केरल जी, ब्लॅकपिंक, सेलेना गोम्ज, बिली एलिस यांना मागे टाकल्यामुळे चाहते फार आनंदी असल्याचे दिसत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Neha kakkar latest video viral on social media avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या