आपल्या सुरेल आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी गायिका नेहा कक्करचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले. रायझिंग स्टार फेम गायक रोहनप्रीत सिंगसोबत २४ ऑक्टोबर २०२० रोजी नेहाने लग्नगाठ बांधली. त्यानंतर सोशल मीडियावर सतत नेहा कक्कर प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता एका कार्यक्रमात नेहाने वक्तव्य करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

नेहाचे काही दिवसांपूर्वी कांटा लगा हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्याच्या प्रमोशनसाठी नेहाने ‘डान्स दीवाने ३’ या शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये तिच्यासोबत तिचा भाऊ टोनी कक्कर आणि रॅपर यो यो हनी सिंग देखील उपस्थित होते. दरम्यान एका स्पर्धकाचा डान्स पाहून नेहा इम्प्रेस झाली आणि म्हणाली, ‘मला असेच मुल हवे आहे.’

rang maza vegla fame sonali salunke engagement
‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीचा पार पडला साखरपुडा, शेअर केले खास फोटो
Amar Singh Chamkila show fee
८० च्या दशकात एका शोसाठी किती मानधन घ्यायचे अमरसिंग चमकीला? रक्कम ऐकून चकित व्हाल
Aishwarya Narkar adah dance video in saree went viral on social media
ऐश्वर्या नारकर यांचा साडीतला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत; चाहते म्हणाले, “अदा, तुमच्यावर सारे फिदा…”
marathi actress Surekha Kudachi exit from Pinkicha Vijay Aso serial
‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतून सुरेखा कुडचींची झाली एक्झिट, भावुक पोस्ट करत म्हणाल्या, “‘देवयानी’पासून…”

दरम्यान, नेहाने आणि रोहनप्रीतने बाळासाठी प्लॅनिंग केलेले नाही असे म्हणत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘डान्स दीवाने ३’ या कार्यक्रमात नेहाला स्पर्धक गुंजनचा डान्स प्रचंड आवडला होता. तिची प्रशंसा करत ती म्हणाली, ‘आयुष्यात तुला हवं ते मिळू दे.’ पुढे नेहा म्हणाली की, ‘मी आणि रोहनने आजून बाळाचे प्लॅनिंग केले नाही. पण जेव्हा कधी करु तेव्हा आमचे बाळ गुंजन सारखे होऊ दे अशी मी देवाकडे प्रार्थना करेन.’

‘डान्स दीवाने ३’ शोमध्ये नेहा, टोनी आणि हनी सिंह हे मजामस्ती करताना दिसत होते. शो मध्ये नेहा भावूक देखील झाली. शोची परिक्षक माधुरी दीक्षितला पाहून नेहा म्हणाली, ‘तुम्हाला भेटल्यानंतर आज मला फॅन मूव्हमेंटचा खरा अर्थ कळाला आहे.’