नेहा कक्करचे ‘कांटा लगा’ गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चेत

या गाण्यात नेहासोबत टोनी कक्कर आणि यो यो हनी सिंग देखील दिसत आहेत.

या गाण्यात नेहासोबत टोनी कक्कर आणि यो यो हनी सिंग देखील दिसत आहेत.

बॉलिवूड लोकप्रिय गायिका नेहा कक्कड, टोनी कक्कड आणि यो यो हनी सिंगचं नवीन गाणं आलं आहे. या तिघांना आता आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे. कांटा लगा असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर काही तासातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.

कांटा लगा या गाण्यात नेहाला गातांना पाहून तिचे चाहते आनंदीत झाले आहेत. यो यो हनी सिंग पुन्हा एकदा त्याच्या देसी अंदाजात दिसत आहे. मोहित गुलाटी दिग्दर्शित या व्हिडिओचे संगीत आणि लिरिक्स टोनीने लिहिले आहेत.नेहा, टोनी आणि यो यो हनी सिंगला या आधी ही आपण एकत्र पाहिलं आहे.

आणखी वाचा : ‘याला म्हणतात संस्कार’, बिग बींची नात आराध्याचा डान्सनंतर भजन गातानाचा व्हिडीओ झाला व्हायरल

आणखी वाचा : प्रियांका चोप्राच्या ‘मॅट्रिक्स ४’ चा ट्रेलर या दिवशी होणार प्रदर्शित!

काही वेळा पूर्वी प्रदर्शित झालेला हा व्हिडीओ ३३ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या गाण्याची निर्मिती देसी म्युझिक फॅक्ट्रीने केली आहे. देसी म्युझिक फॅक्टरीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अंशुल गर्ग यांनी गाणे रिलीज झाल्यानंतर सांगितले की, प्रेक्षक काटा लगाची आतुरतेने वाट पाहत होते. आम्ही हे गाणे जगभरातील नेहा, टोनी आणि हनीच्या चाहत्यांना समर्पित करतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Neha kakkar tony kakkar yo yo honey singh song kanta laga released dcp

ताज्या बातम्या