बॉलिवूडची लोकप्रिय गायिता नेहा कक्कर आणि पती रोहनप्रीत सिंग यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ते दोघे नेहमीच सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. पण यावेळी ते एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. रोहनप्रीत सिंगचा सामान हा एका हॉटेलमधून चोरीला गेल्याची बातमी समोर आली आहे.
रोहनप्रीत हा शुक्रवारी रात्री हिमाचल प्रदेशातील मंडी येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये थांबला होता. त्या दोघांनी हे हॉटेल फक्त एक रात्र घालवण्यासाठी बूक केले होते. जेणेकरून ते प्रवासा करण्यापूर्वी आराम करू शकतील. या हॉटेलमधील त्यांच्या रूममधून रोहनप्रीत सिंगचं अॅपल वॉच, आयफोन आणि हिऱ्याची अंगठी चोरीला गेली. रोहनप्रीतने रात्री रूममध्ये झोपण्याआधी ज्या टेबलवर हा सामान ठेवला होता ते सर्व सकाळी गायब झालं. रोहनप्रीतने चोरीची तक्रार पोलिसांकडे केली होती.
आणखी वाचा : लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अमिताभ बच्चन यांना पाहून माधुरीचे पती डॉ नेने, म्हणाले “मी यांना…”
आणखी वाचा : मराठीतला आजवरचा सर्वात BOLD टीझर, तेजस्विनी पंडीतच्या ‘रानबाजार’ची झलक पाहिलीत का?
एसपी मंडी शालिनी अग्निहोत्री यांनी या चोरीला दुजोरा दिला असून तक्रार नोंदवण्यात आल्याचे सांगितले आहे. तक्रारीनंतर पोलीस हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज चेक करत असून हॉटेल कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे.
रोहनप्रीत स्वतः एक गायक देखील आहे आणि तो स्वतः त्याच्या गाण्यांच्या शो करत असतो. नेहा कक्करसोबत रिलेशनशिपमध्ये आल्यापासून रोहनप्रीत प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्यांच्या लग्नाची बातमी आधी पसरली होती. दोघांनी लग्नाआधी लग्नाचे गाणेही रिलीज केले होते. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. नेहानेही नुकताच रोहनसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. दोघांचा हा हॉटेलमधला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.