‘बाबू’ चित्रपटात ही अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत

या अभिनेत्रीचा चित्रपटाच्या सेटवरचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

neha mahajan, neha mahajan movie, babu, babu movie, ankit mohan,

काही दिवसांपूर्वी ‘बाबू’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. या चित्रपटातील एक ॲक्शन सीन चर्चेत होता. या सीनमध्ये अभिनेता अंकित मोहनची जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळाली. त्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटात कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आता या चित्रपटात मूख्य भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे.

ॲक्शनचा धमाका असणाऱ्या ‘बाबू’ या चित्रपटात आता नेहा महाजनची एण्ट्री झाली आहे. मराठी, हिंदी चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेली नेहा महाजन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या तिचा या चित्रपटातील लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात तिने लाल रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. त्यामुळे नेहाचा हा एकंदर पेहराव बघून या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांमधील उत्सुकता आता अधिकच वाढली आहे.

आता चित्रपटात नेहाची भूमिका काय आहे? असा प्रश्न पडला आहे. प्रेक्षकांमा त्यांच्या या प्रश्नाचे लवकरच उत्तर मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे हे असून निर्माता बाबू के. भोईर हे आहेत. श्री कृपा प्रोडक्शन निर्मित ‘बाबू’ या चित्रपटात अंकित मोहन, नेहा महाजनसोबत रुचिरा जाधवही दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Neha mahajan going to play lead role in babu movie avb