गेल्या काही दिवसांपासून नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेनन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘जून’ हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. पण आता ही उत्सुकता संपली आहे. आता अखेर ३० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. नेहा पेंडसे बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन आणि निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी केले आहे. तर जितेंद्र जोशी, निखिल महाजन यांचे शब्द लाभलेल्या या चित्रपटातील गाणी शाल्मलीने गायली आहेत.

‘जून’ चित्रपटाची कथा ही नेहा (नेहा पेंडसे) आणि नील (सिद्धार्थ मेनन) यांच्याभोवती फिरते. चित्रपटाच्या सुरुवातीलाच नेहा ही मुंबई शहर सोडून काही दिवस औरंगाबादला राहण्यासाठी जाते. स्वत:च्या एका चुकीमुळे बाळ गमावल्यानंतर नेहा थोडी खचलेली दिसते. ती काही दिवस नवऱ्याच्या औरंगाबाद येथे असलेल्या फ्लॅटवर एकटी राहण्याचा निर्णय घेते. तेथे तिची ओळख नीलशी होते. नील हा मूळचा औरंगाबदामधील एका मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगा असतो. पण इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात गेलेला नील नापास होतो आणि वर्षभरासाठी घरी परत येतो. नेहा आणि नील यांच्यात चांगली मैत्री होते. ते दोघेही एकमेंकांच्या आयुष्यात असलेल्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करतात. पण सामाजाचा एक विवाहित माहिला आणि तरुण मुलगा यांच्या मैत्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा फार वेगळा असतो हे चित्रपटात दाखवण्यात आले. चित्रपटात नील सतत त्याच्या गर्लफ्रेंडशी भांडताना दिसतो. तो तिच्यासोबत ज्या प्रकारे वागतो नेहाला प्रचंड राग येतो. त्यावरुन त्यांच्यामध्ये वाद देखील होतात. पुढे नेहा आणि नीलच्या आयुष्यात काय होते हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट नक्की पाहावा लागेल.

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
sanjay-leela-bhansali-priyanka-chopra
नऊ वर्षांनी प्रियांका चोप्रा झळकणार संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात; देसी गर्ल लवकरच करणार घोषणा

चित्रपटातील जमेची बाजू म्हणजे औरंगाबादमधील काही पर्यटन स्थळे दाखवण्यात आली आहेत. तसेच औरंगाबादमधील काही प्रसिद्ध खाद्यपदार्थ दाखवण्यात आले आहेत. कधी औरंगाबाद न पाहिलेल्या प्रेक्षकांना थोडीफार औरंगाबादची सफर नक्कीच करता येईल. पण चित्रपटात सतत नेहा पेंडसेच्या तोंडून निघणारी इंग्रजी वाक्य प्रेक्षकांची डोके दुखी ठरणार आहेत. चित्रपटाचे नाव ‘जून’ का ठेवले असा प्रश्न प्रेक्षकांना चित्रपटाच्या सुरुवातील नक्की पडेल. पण या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपटाच्या शेवटी मिळेल. एक नक्की, या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा काहीतरी सकारात्मक विचार देऊन जाणारी आहे.

अभिनयाविषयी बोलायचे झाले तर नेहाचा अभिनय पाहाण्यासारखा आहे आणि सिद्धार्थ मेननने तर आपल्या अभिनयातून नक्कीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच चित्रपटात नीलच्या गर्लफ्रेंडची भूमिका अभिनेत्री रेशम श्रीवर्धनने साकारली आहे. तिचा अभिनय आणि चित्रपटातील भूमिका ही प्रेक्षकांच्या नक्की मनाला भावणारी आहेत.