scorecardresearch

‘लाल सिंग चड्ढा’साठी आमिर खानने मागितली ‘एवढी’ रक्कम, पण नेटफ्लिक्सने दिला स्पष्ट नकार

आमिर खानने ‘लाल सिंह चड्ढा’च्या डिजिटल हक्कांसाठी खूप जास्त किंमत सांगितल्याने आमिर आणि नेटफ्लिक्समधला होणारा करार रद्द झाला आहे.

‘लाल सिंग चड्ढा’साठी आमिर खानने मागितली ‘एवढी’ रक्कम, पण नेटफ्लिक्सने दिला स्पष्ट नकार

आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला आहे. सुट्ट्या आणि मोठा वीकेंड असूनही चित्रपटाच्या कमाईमध्ये वाढ होण्याऐवजी घटच झालेली दिसून येत आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ची पहिल्या आठवड्यातली कमाई जेमतेम ३७ करोड इतकी आहे. आमिरच्या गेल्या काही वर्षातल्या करियरमधला हा सर्वात फ्लॉप चित्रपट मानला जात आहे. आमिरचा ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ हा चित्रपटसुद्धा फ्लॉपच होता, पण या फ्लॉप चित्रपटाची एका दिवसाची कमाई तब्बल ५० करोड होती. असं असलं तरी आमिर त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा’साठी ओटीटी प्लॅटफॉर्मशी झगडतो आहे अशा चर्चा रंगत आहेत. ‘बॉलिवूड हंगामा’ या मनोरंजनविश्वाशी निगडीत असलेल्या साईटच्या बातमीनुसार आमिर आणि नेटफ्लिक्स यांच्यात ‘लाल सिंग चड्ढा’बद्दल खटके उडाले आहेत.

बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार आमिर खानने ‘लाल सिंह चड्ढा’च्या डिजिटल हक्कांसाठी खूप जास्त किंमत सांगितल्याने आमिर आणि नेटफ्लिक्समधला होणारा करार रद्द झाला आहे. आमिरच्या मनात सुरुवातीपासूनच ‘लाल सिंग चड्ढा’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित व्हावा अशी इच्छा होती. कारण त्याच्या चित्रपटाला एक चांगला प्रेक्षकवर्ग मिळेल आणि त्यामाध्यमातून साऱ्या जगापर्यंत हा चित्रपट पोहोचेल असं आमिरला वाटत होतं.

जेव्हा या संदर्भात आमिरने नेटफ्लिक्सच्या लोकांशी बोलाचाली सुरुवात केली तेव्हा त्याने सुरुवातीला या चित्रपटासाठी नेटफ्लिक्सने १५० करोड रुपये द्यावेत अशी मागणी केली होती. याबरोबरच चित्रपट सिनेगृहात प्रदर्शित झाल्यानंतर तो किमान ६ महीनेतरी ओटीटीवर येणार नाही यावर आमिर अडून होता. या सगळ्या गोष्टीवरून नेटफ्लिक्सने आमिरला फक्त ८० ते ९० करोड देण्याचीच तयारी दर्शवली. या वाटाघाटीमध्ये शेवतो नेटफ्लिक्सने ५० करोड एवढीच रक्कम देणार असं म्हंटलं, तरी आमिर १२५ करोड या आकड्यांवर अडून राहिला. नेटफ्लिक्सला ही किंमत जरा जास्तच वाटली. यामुळेच आमिर आणि नेटफ्लिक्समधला हा करार तूर्तास रद्द झालं असल्याचं सांगितलं जात आहे.

आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरल्याने सध्या कोणताच ओटीटी प्लॅटफॉर्म आमिर म्हणतोय ती रक्कम देण्यास तयार नाहीये. ज्या चित्रपटाला लोकांनी बॉयकॉट केलं, तो चित्रपट आपल्या प्लॅटफॉर्मवर घेऊन प्रेक्षकांचा रोष पत्करण्यास कोणतंही डिजिटल माध्यम तयार नाही. सध्या आमिर आणि चित्रपटाचे निर्माते यांच्याकडे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यासाठी ‘वूट’ हा शेवटचा पर्याय आहे असंही म्हंटलं जात आहे.

आणखीन वाचा : “आमिर खान कधीच बॉयकॉट होऊ शकत नाही कारण…” ‘लाल सिंग चड्ढा’बाबत स्पष्टच बोलली एकता कपूर

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Netflix refuses to pay the quoted price by aamir khan for laal singh chaddha avn