“बदकासारखी काय चालतेस?”, मलायका अरोरा पुन्हा झाली ट्रोल

मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

malaika
(Photo-Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सिनेसृष्टिपासून लांब असली तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. ती अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड फोटोमुळे सतत चर्चेत असते. बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिप असो किंवा तिने परिधान केलेले ड्रेस, तिला वेगवेगळ्या कारणांसाठी अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. यावेळेस मलायकाला तिच्या चालण्याच्या पद्धतीवरुन ट्रोल करण्यात आले आहे.

मलायका अरोराला ही बी-टाऊनमधील सर्वात फिट अभिनेत्रीपैकी एक आहे. तिला अनेकदा जीमला जाताना स्पॉट करण्यात आले आहे. नुकतंच तिला तिच्या मुंबईतील एका जीमबाहेर स्पॉट केले होते, यावेळीस तिच्या विचित्र ‘बदका सारख्या’ चालीसाठी नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. मलायकाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर बॉलिवूड पॅपने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन मलायका योगा सुडिओत जाताना दिसत आहे.

मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकरी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहे. एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, “अरे, कशी चालते आहे ही!”, दुसऱ्या युजरने लिहिले, “स्टाइल मारता मारता चाल बिघडली आहे.” तिसऱ्या युजरने लिहिले, “बदकासारखी चालते आहे”.

मलायका ४७ वर्षांची असली तरी तिचा फिटनेस हा एका तरुणीसारखा आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून इनस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मलायका या आधी सुद्धा तिच्या लूकसाठी अनेकदा ट्रोल झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Netizens brutally trolled malaik arora for her walk aad

ताज्या बातम्या