Netizens saying actor sharad kelkar will be playing bajiprabhu deshpande role in har har mahadev film rnv 99 | 'हर हर महादेव' चित्रपटात अभिनेता शरद केळकर साकारणार बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका ? | Loksatta

‘हर हर महादेव’ चित्रपटात अभिनेता शरद केळकर साकारणार बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका ?

याआधी शरदने ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्याने साकारलेल्या या भूमिकेचे प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक झाले.

‘हर हर महादेव’ चित्रपटात अभिनेता शरद केळकर साकारणार बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका ?
शरद केळकर

मराठी सिनेसृष्टीत अनेक ऐतिहासिक चित्रपट बनत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिजीत देशपांडे दिग्दर्शित आणि झी स्टुडिओची निर्मिती असलेला ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात मराठीतील हरहुन्नरी अभिनेता अशी ओळख असलेला सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. पावनखिंड येथे घडलेला थरार या चित्रपटातून उलगडला जाणार असल्याने या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आणखी वाचा : अभिजीत खांडकेकर आणि सिद्धार्थ जाधव पहिल्यांदाच दिसणार एकत्र, चित्रपटाचे हटके पोस्टर प्रदर्शित

गेले अनेक दिवस ‘हर हर महादेव’ हा चित्रपट चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या सुबोध भावेचा या चित्रपटातील लूक आउट झाला होता. त्यानंतर या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. याबद्दल नेतकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगलेली आहे. ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या वृत्तानुसार बहुआयामी अभिनेता शरद केळकर या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षकांमध्येही शरद केळकर ही भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु चित्रपटाच्या टीमकडून अद्याप तशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

याआधी शरदने ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्याने साकारलेल्या या भूमिकेचे प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक झाले. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत पाहायला प्रेक्षक आतुर झाले आहेत.

हेही वाचा : सुबोध भावेने केली नव्या चित्रपटाची घोषणा, महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन

हर हर महादेव चित्रपटात अनेक नामवंत कलाकारांची मांदियाळी असणार आहे. मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेतून प्रदर्शित करण्याचा निर्णय झी स्टुडिओजने घेतलेला आहे. विशेष म्हणजे येत्या दिवाळीत पाच भारतीय भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे. येत्या २५ ऑक्टोबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“आम्ही दोघांनी…” पाकिस्तानी अभिनेत्याला डेट करण्यावर अमिषा पटेलची पहिली प्रतिक्रिया

संबंधित बातम्या

“सैराटने मराठी चित्रपटसृष्टी उद्ध्वस्त केली”; अनुराग कश्यपचं मोठं विधान, ‘कांतारा’च्या यशानंतर रिषभ शेट्टीला सल्ला देत म्हणाला…
अक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
“दोन दिवस मी पुण्यात…” अचानक लाइव्ह येण्यामागे संकर्षण कऱ्हाडेने दिलं कारण
“…म्हणून मी ‘कांतारा’सारखा चित्रपट कधीच बनवणार नाही”; ‘तुंबाड’शी तुलना झाल्यावर दिग्दर्शकाने मांडलं स्पष्ट मत
“अश्लील हावभाव व अंगप्रदर्शन…” सध्याच्या लावणी प्रकाराबाबत ज्येष्ठ ‘लावणीसम्राज्ञी’ सुलोचना चव्हाण यांनी केलं होतं भाष्य

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“पहिल्यांदा तुला मिठी मारून रडले…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावची भावासाठी खास पोस्ट
“न्यायव्यवस्थेला बुडाखाली घेण्याचा सरकारचा प्रयत्न” – उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात!
दीपिकाचा हॉट बिकिनीमधील फोटो शेअर करत शाहरुख खानने दिली ‘पठाण’बद्दल मोठी अपडेट; चाहते म्हणाले…
VIDEO: मुंबईतील स्वच्छतागृहांची अवस्था म्हणजे ‘बाहेर एसी आणि आतमध्ये देशी’ – देवेंद्र फडणवीस
Jaydev Unadkat Tweet: ११ महिन्यानंतर उनाडकटचे ‘हे’ ट्विट होत आहे व्हायरल; जाणून घ्या कारण