Ranveer Allahbadia: प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया व कॉमेडियन समय रैनावर सोशल मीडियावर प्रचंड टीका होत आहे. समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ च्या ताज्या भागात रणवीर अलाहाबादियाने हजेरी लावली. आशिष चंचलानी व अपूर्व मुखिजादेखील या शोमध्ये होते. रणवीरने या शोमध्ये केलेल्या एका कमेंटवरून नेटकरी भडकले आहे. सोशल मीडियावर लोक रणवीरला खूप ट्रोल करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला विचारलं की, ‘तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल?’ यापैकी कोणताही एक पर्याय निवडायला रणवीरने सांगितलं. रणवीरचा प्रश्न ऐकल्यानंतर समय रैना म्हणतो की हे सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न आहेत.

रणवीरच्या या प्रश्नाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याला खूप ट्रोल केलं जात आहे. त्याला बॉयकॉट करण्याचीही मागणी होत आहे. आपल्या पॉडकास्टसाठी प्रसिद्ध असलेल्या रणवीरकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

लेखक नीलेश मिश्रा यांनीही त्यांच्या ट्विटरवर पोस्ट शेअर करून रणवीरवर प्रचंड टीका केली आहे. नीलेश मिश्रा यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर रणवीरची एक क्लिप शेअर केली आणि लिहिलं,”आपल्या देशाच्या क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेला आकार देणाऱ्या विकृत क्रिएटर्सना भेटा. या सर्वांचे लाखो फॉलोअर्स असतील, याची मला खात्री आहे. या कंटेंटला अडल्ट कंटेंट म्हटलेलं नाही. अल्गोरिदममध्ये आल्यास एखादा लहान मुलगाही हा व्हिडीओ फोनमध्ये सहज पाहू शकतो. क्रिएटर्स किंवा प्लॅटफॉर्सची काहीच जबाबदारी नाही. डेस्कवरील चार लोक आणि प्रेक्षकांपैकी अनेकजण या यावर हसले असतील, यात आश्चर्य नाही. खरं तर तुमच्यासारख्या प्रेक्षकांनीच या गोष्टी नॉर्मल केल्या आहेत. हे क्रिएटर्स लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी खालच्या थथराला जात आहेत. हे लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही बोलून स्वतःचा बचाव करू शकतात.”

नीलेश मिश्रा यांची पोस्ट

नीलेश मिश्रा यांची पोस्ट (फोटो- स्क्रीनशॉट)

शोमधील हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रणवीर अलाहाबादियावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात अनेक ठिकाणी रणवीर व समय यांच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्याचे वृत्त आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizens slammed ranveer allahbadia on indias got latent video samay raina show hrc