scorecardresearch

“फोटोशॉप केलंय”, शर्लिन चोप्राने राज कुंद्रासोबत शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवर नेटकरी म्हणाले…

अनेक नेटकऱ्यांनी शर्लिन चोप्राने यात फोटोशॉप केल्याचं म्हणत तिला फटकारलं आहे.

sherlyn-chopra-raj-kundra (1)
(Photo-Twiter/ Sherlyn Chopra)

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात नुकतच मॉडेल शर्लिन चोप्राला चौकशीसाठी क्राइम ब्रांचमध्ये बोलावण्यात आलं होतं. या चौकशी दरम्यान शर्लिनने अनेक गोष्टींचा खुलासा केला. राज कुंद्राने संपर्क साधला असून आपण करारही केल्याचं ती म्हणाली होती. त्यानंतर शर्लिन चोप्राने राज कुंद्रासोबतच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

शर्लिन चोप्राने राज कुंद्रासोबत फोटो शेअर केल्याने सोशल मीडियावर एकच खळबळ माजली. हा फोटो ‘शर्लिन चोप्रा अॅप’ च्या पहिल्या कटेंट शूटचा असल्याचं शर्लिन पोस्टमध्ये म्हणालीय. असं असलं तरी अनेक नेटकऱ्यांनी शर्लिन चोप्राने यात फोटोशॉप केल्याचं म्हणत तिला फटकालं आहे.

हे देखील वाचा: शर्लिन चोप्राने राज कुंद्रासोबतचा ‘तो’ फोटो शेअर केल्याने सोशल मीडियावर खळबळ

एक युजर या फोटोवर कमेंट करत म्हणाला, “मी कुंद्राची बाजू घेत नाहीय. मात्र नीट पहा फोट एडिट करण्यात आलाय. यात नीट पहा तिघांच्या सावलीत फरक आहे.”

तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “चांगलं एडिट केलंय मॅम”

शर्लिन चोप्राने ट्विटरवर हा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली होती. . फोटो शेअर करत तिने लिहिलंय, “२९ मार्च २०१९ चा दिवस, आर्म्सप्राइम आयोजित ‘द शर्लिन चोप्रा’ अ‍ॅपच्या पहिल्या कंटेंटचं शूटिंग सुरु होणार होतं. माझ्यासाठी नवा अनुभव होता कारण यापूर्वी कधी अशा अ‍ॅपसोबत काम केलं नव्हत. आशा आणि उत्साहाचं वातावरण होतं.” असं शर्लिन तिच्या पोस्टमध्ये म्हणाली आहे. हा फोटो सध्या सोशाल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-08-2021 at 14:49 IST
ताज्या बातम्या