Netra Mantena Vamsi Gadiraju Udaipur Wedding : गेल्या वर्षी मुकेश अंबानी व नीता अंबानींचे चिरंजीव अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा भव्य विवाह सोहळा मुंबईत पार पडला होता. त्यानंतर भारतात आणखी एक हाय-प्रोफाइल लग्न होणार आहे. अमेरिकेतील उद्योगपती रामा राजू मंटेना यांची मुलगी नेत्रा मंटेना आणि वामसी गदीराजू विवाहबंधनात अडकणार आहेत. नेत्रा व वामसी यांच्या तीन दिवसांच्या लग्न समारंभासाठी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी उदयपूरला जात आहेत.

२१ नोव्हेंबरपासून सुरू होणारा हा सोहळा २३ नोव्हेंबर रोजी लग्न झाल्यावर संपेल. राजस्थानमधील उदयपूर इथे हा शाही सोहळा होईल. या सोहळ्यात डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर, जस्टिन बीबर, जेनिफर लोपेझ आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच बॉलीवूडमधील हृतिक रोशन, रणवीर सिंह आणि इतर अनेक जण या सोहळ्यात सहभागी होतील अशा चर्चा आहेत.

Award Banner

उद्योगपती रामा राजू मंटेना यांची मुलगी नेत्रा मंटेना ही वामसी गदिराजूशी लग्न करणार आहे. वामसी व नेत्रा यांच्या लग्नाचे इतर कार्यक्रम तीन दिवस चालणार आहेत. उदयपूरमधील अनेक आलिशान ठिकाणी हा विवाह सोहळा पार पडेल. यात द लीला पॅलेस, झेनाना महल आणि पिचोला तलावावरील आयलंड पॅलेस यांचा समावेश आहे.

शुक्रवारी एक जंगी म्युझिकल नाईट होणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्टार जस्टिन बीबर, जेनिफर लोपेझ, टिएस्टो, ब्लॅक कॉफी, सर्क डू सोलेइल आणि डीजे अमन नागपाल परफॉर्म करतील.

हृतिक रोशन, रणवीर सिंह, नोरा फतेही, शाहिद कपूर, करण जोहर, वरुण धवन, जान्हवी कपूर, क्रिती सेनॉन, जॅकलीन फर्नांडिस, दिया मिर्झा, अमायरा दस्तूर, सोफी चौधरी आणि माधुरी दीक्षित नेने हे बॉलीवूड सेलिब्रिटी लग्नाला हजेरी लावतील अशी चर्चा आहे.

पाहा व्हिडीओ

रामा राजू मंटेना कोण आहेत?

अब्जाधीश रामा राजू मंटेना हे ऑर्लँडोमधील इंजेनियस फार्मास्युटिकल्सचे अध्यक्ष आणि सीईओ आहेत.