सिनेमाची नवी सुरुवात…!

आपले काम लोक  आवर्जून बघतात. आणि प्रेमाने प्रतिसाद देतात याबद्दल नेहमी आपुलकी वाटते आणि छान वाटतं. ‘

|| गायत्री हसबनीस

‘खिलाडीयों का खिलाडी’ म्हणून बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारची ओळख सर्वांनाच आहे? गेल्या तीन दशकांपासून त्याच्या अभिनयावर भरपूर प्रेम करणारे जगभरातील त्याचे लाखो चाहते ‘सूर्यवंशी’ कधी एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे याची वाट पहात होते. खासकरून अक्षय कुमारचा वीर सूर्यवंशी रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली कसा असेल, याचीही प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता होती जी सध्या तिकीटबारीवर या चित्रपटाने मिळवलेल्या यशात रूपांतरित झाली आहे. एक अभिनेता म्हणून प्रेक्षकांचं जे प्रेम आपल्याला सातत्याने मिळत आलं आहे, त्याबद्दल आपण ऋणी असल्याची भावना अक्षयने व्यक्त के ली.

स्टंटबाजी करत प्रेमाने प्रेक्षकांच्या शिट्ट्या घेणारा अ‍ॅक्शन हिरो, विनोदी अभिनेता ते नायिके ला पटवणारा प्रणयी हिरो सगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या अक्षय कुमारच्या वीर सूर्यवंशीलाही प्रेक्षकांनी त्याच प्रेमाने स्वीकारले आहे. ‘आपले काम लोक  आवर्जून बघतात. आणि प्रेमाने प्रतिसाद देतात याबद्दल नेहमी आपुलकी वाटते आणि छान वाटतं. ‘सूर्यवंशी’वर केलेल्या भरभरून प्रेमाबद्दल जगभरातील प्रेक्षकांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. पण म्हणून माझं काम इथेच थांबणार नाही आहे, तर अजूनही खूप काम करायचे आहे. खूप काही शिकायचे आहे’, अशी प्रांजळ भावना अक्षयने व्यक्त के ली. ‘सूर्यवंशी’ने भरघोस यश मिळवल्याच्या निमित्ताने अक्षय कु मारने माध्यमांशी संवाद साधला. या चित्रपटाने फक्त पाच दिवसांत तब्बल शंभर कोटींची कमाई केली आहे. दिवाळीत अक्षय कुमारच्या या चित्रपटाने दिलेला दणका प्रेक्षकांनी प्रेमाने स्वीकारला आहे, किंबहुना डोक्यावर घेतला आहे. 

रोहित शेट्टीचा अ‍ॅक्शनपट, जोडीला अक्षय कुमार, कतरिना कैफ, अजय देवगण, जॅकी श्रॉफ आणि रणवीर सिंग अशी तगडी कलाकारांची फौज… त्यामुळे ‘सूर्यवंशी’ हिट ठरणार याबद्दल इंडस्ट्रीत आधीच अंदाज बांधले गेले होते. ‘सूर्यवंशी’ हा तद्दन मसालापट असल्याने तो चालणार नाही अशी कल्पना कोणीही के ली नसती, मात्र माझ्या मते चित्रपट हा एक उद्योग आहे. यात कोणालाही नुकसान झाले तर ते सहन होणारे नाही, त्यामुळे यशस्वी चित्रपट देण्यासाठी प्रयत्न करत राहणं एवढंच आमच्या हातात आहे, असं अक्षय म्हणतो. ‘आम्हाला कसलाच अंदाज नव्हता की ‘सूर्यवंशी’ला चटकन एवढा मोठा प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळेल. खरंतर ‘बेल बॉटम’ हा चित्रपट या अगोदर प्रदर्शित केला. तो केवळ एक प्रामाणिक प्रयत्न होता. ‘सूर्यवंशी’ हादेखील तसाच एक प्रामाणिक प्रयत्न आहे जो मी आणि रोहित यांनी केला आहे. ज्याला अभूतपूर्व यश मिळाले आहे’, असं तो म्हणतो. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षयने पहिल्यांदाच रोहित शेट्टीबरोबर काम के लं आहे.  रोहित अत्यंत मेहनती आणि मनमोकळा दिग्दर्शक आहे, अशा शब्दांत त्याने आपल्या दिग्दर्शकाची स्तुतीही के ली. ‘रोहितला मी खूप आधीपासूनच ओळखतो. तो तेव्हा जसा होता तसाच आजही आहे. चित्रीकरणादरम्यान तर त्याला मी खाली खुर्चीवर आरामात बसलेलंही फार कमी पाहिलं आहे, कारण जोपर्यंत चित्रीकरण मनाप्रमाणे होत नाही तोपर्यंत तो उभा राहून काम करत असतो. इतक्या मेहनतीने काम करणारे फार कमी दिग्दर्शक असतात’, असं तो म्हणतो.

आतापर्यंत अक्षयने त्याच्या चित्रपटातून सर्वात जास्त स्टंट केलेले आहेत. सतत स्टंट करत राहण्याबद्दल भीती वाटते का?, या प्रश्नावर उत्तर देताना मी याचा खूप व्यावहारिक पद्धतीने विचार करतो, असं तो सांगतो. ‘माझ्या मते भीती दोन प्रकारची असते एक चांगली तर दुसरी वाईट. चांगली भीती म्हणजे समजा मला टेबलवरून उडी मारायची आहे. तर मी आजूबाजूच्या परिसराचा आढावा घेईन जेणेकरून मला कुठे दुखणार – खुपणार नाही. ती भीती असली तरी ती चांगली आहे, कारण त्यात मी माझ्या सुरक्षिततेचा विचार करून निर्णय घेतो आहे हे मला चांगलंच माहिती आहे. त्याविरुद्ध वाईट भीती ही अशी असते, ज्यात आपण आपल्या सुरक्षिततेची जराही पर्वा न करता बेछूटपणे वागतो. मी जर  हेलिकॉप्टरवरून एखादा स्टंट करणार असेन तर मी आधी सर्व तांत्रिक गोष्टी समजून घेतो. मी किती वेळ पायलट सोबत असेन, काय काळजी मला घ्यायला हवी या सर्व गोष्टी मी तपासून घेतो. स्टंटबाजी हा सिनेमाचा एक अविभाज्य भाग असला तरी त्याचा सर्जनशीलतेने विचार के लेला असतो आणि तो विचार महत्त्वाचा असतो’, असं अक्षय सांगतो. कु ठलाही चित्रपट करत असताना त्यात काय प्रयोग करता येईल, कल्पकतेने तो कसा करता येईल याबद्दल आपणही लेखक – दिग्दर्शक मित्रांशी तासन्तास बोलत असल्याचं त्याने स्पष्ट के लं. ‘गेल्या दीड वर्षात करोनामुळे आपलं जीवन खूप बदललं आहे, पण तरीही त्यातून मिळणारा धडा हाच आहे की कोणत्याही परिस्थितीत थांबू नका, सतत काम करत राहा आणि पुढे जात राहा. आताच्या काळात उलट चित्रपट निर्मात्यांनी न घाबरता सगळी काळजी घेऊन चित्रपट प्रदर्शित के ले पाहिजेत’, असेही तो खमके पणाने सांगतो. 

चित्रपटसृष्टीत आता एका नव्या सुवर्णकाळाची सुरुवात होते आहे. आता इथे थांबणं नको. सतत पुढे जात राहण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असायला हवं, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच आपण स्वत: याच विचाराने पुढे जात असल्याचेही त्याने स्पष्ट के लं. माझ्या वाट्याला यापुढेही चांगल्या कथा, चांगल्या भूमिका येत राहतील. फक्त पैसे कमवण्यापुरता माझा विचार नाही, तर नक्कीच माझ्या कामातले वेगळेपण मला लोकांपर्यंत पोहचवायचे आहे, असेही तो विश्वासाने सांगतो. आपल्या चित्रपटात वेगळेपण असावे असं मनापासून सांगणारा अक्षय आपल्या आगामी ‘अतरंगी’, ‘पृथ्वीराज चौहान’, ‘बच्चन पांडे’ या चित्रपटांच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहतो आहे. अर्थात, प्रेक्षकही त्याला या वेगवेगळ्या भूमिकांमधून पाहण्यासाठी उत्सुक आहेत हे वेगळं सांगायला नको.

‘कलाकारांचं वलयच फक्त महत्त्वाचं आहे असं मी मानत नाही? सध्या लेखक हाच मोठा स्टार आहे. त्यांच्या लेखणीतून उतरलेला नायक / नायिका एक स्टार म्हणून घडत असतात, कारण ते आम्हा कलाकारांना घडवतात. प्रेक्षक अर्थात फक्त नायक आणि नायिकेलाच बघायला येतात असं नाही तर ते सिनेमाची गोष्ट ऐकायला येतात. माझ्यासाठी जर प्रेक्षक येत असेल चित्रपटगृहात तर तो नक्कीच माझ्या सिनेमाची गोष्ट ऐकायला, पहायला येतो’.

‘मराठी सिनेमाचे यश हे त्यांच्या संहितेत आहे? मला वैयक्तिक पातळीवर मराठी सिनेमे खूप आवडतात. हिंदीपेक्षा मराठी सिनेमा अधिक धाडसी आहे. नवी संधी आली तर ‘चुंबक’प्रमाणे मला आणखी एका मराठी सिनेमाची नक्कीच निर्मिती करायला आवडेल’. – अक्षय कुमार

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New beginning of cinema bollywood superstar akshay kumar identity akp

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या