लवकरच होणार मनोरंजनाचा नवा आरंभ

मालिकांचं शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.

गेल्या तीन महिन्यामध्ये करोनामुळे ओढावलेल्या संकटामुळे सगळ्यांचीच आयुष्य थांबली असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. ज्या मुंबईला थांबणं माहित नव्हतं ती मुंबापुरी या लॉकडाउनच्या काळात अक्षरश: स्तब्ध झाली. ज्या सेटवर लाईट्स कॅमेरा अॅक्शन असा आवाज ऐकू येत असे तिथे शुकशुकाट पसरला. कलाकारांची धावपळ, गजबजेलेले सेट्स, शूटिंगसाठी चोवीस तास राबणारी यंत्रणा थांबली. पण, आता मात्र सगळ हळूहळू पूर्ववत होताना दिसू लागले आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकांचं शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.

लॉकडाउनच्या काळात कुटुंबातले सर्वच सदस्य घरी असल्याने सर्व वयोगटातील प्रेक्षकांचे मनोरंजन होईल या दृष्टीने वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमे, रिअॅलिटी शोज, आवडत्या जुन्या मालिकांच्या भागांचे पुन:प्रक्षेपण केले. याचसोबत प्रेक्षकांना उत्सुकता होती त्यांचे लाडके कलाकार काय करत आहेत ? त्यांचा दिनक्रम काय आहे ? त्यांचे छंद काय आहेत, ते कसे जोपासत आहेत ? हे जाणून घेण्याची. ‘लॉकडाउन डायरी’ या उपक्रमामधून कलर्स मराठीने प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवली.

कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकांचं शूटिंग पुन्हा सुरू होणार असून प्रेक्षकांना नवीन एपिसोड्स लवकरच बघता येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: New episodes of marathi serials to start soon on colors marathi ssv