बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित हॉरर कॉमेडी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.
अक्षय कुमारने ट्विटरद्वारे ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटातील नवे गाणे ‘बुर्ज खलीफा’ प्रदर्शित झाल्याचे सांगितले आहे. हे गाणे दुबईमध्ये चित्रीत करण्यात आले आहे. गाण्यातील अक्षय आणि कियाराचा लूक देखील पाहण्यासारखा आहे. हे गाणे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. गाणे प्रदर्शित होताच जवळपास २३ लाख लोकांनी पाहिले आहे. चित्रपटाच्या ट्रेलर प्रमाणेच गाण्याचेही लाइक आणि डिसलाइक हाइड करण्यात आले आहे.
‘बुर्ज खलिफा’ गाण्यात अक्षय आणि कियारा यांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्याचे अक्षयने ट्विटरद्वारे सांगितले आहे. ‘आम्ही वर्ष भरातील सर्वात मोठा म्यूझिक ट्रॅक रिलिज केला आहे. पाहा बुर्ज खलिफा गाणे’ असे अक्षयने म्हटले आहे.
We just dropped the biggest dance track of the year! Get ready to get grooving. Watch #BurjKhalifa, song out now https://t.co/iKYCNpcrl0#FoxStarStudios #DisneyPlusHotstarMultiplex #YehDiwaliLaxmmiBombWali @advani_kiara @offl_Lawrence @Shabinaa_Ent @TusshKapoor @foxstarhindi
— Akshay Kumar (@akshaykumar) October 18, 2020
अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. राघव लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. येत्या दिवाळीमध्ये लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या दिवशी हा चित्रपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएई या देशातही प्रदर्शित करण्यात येणार आहे.