“माझा या सर्व गोष्टींवर विश्वास नाही,” अनिल कपूरच्या धाकट्या लेकीचा करवा चौथ साजरा करण्यास नकार

रिया कपूरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहित याबाबतची माहिती दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची धाकटी लेक रिया कपूर काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंड करण बुलानीसोबत विवाहबंधनात अडकली. रियाने अगदी साध्या पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, आता रिया कपूरने करवा चौथ साजरा करण्यास नकार दिला आहे. तसेच करवा चौथ संबंधित कोणत्याही प्रकारचा उत्सव साजरा करणे यावर मी विश्वास ठेवत नाही, असे तिने स्पष्ट केले आहे.

रिया कपूरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहित याबाबतची माहिती दिली आहे. “मला मोठ्या सन्मानाने एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की करवा चौथच्या निमित्ताने मला कोणतेही भेटवस्तू पाठवू नका. तसेच या उत्सवासाठी माझ्याकडे येऊ नका. मी या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. आम्ही दोघेही हा उत्सव साजरा करणाऱ्या जोडप्यांच्या भावनांचा आदर करतो. पण माझा या सर्व गोष्टींवर विश्वास नाही. करवा चौथ या गोष्टींवर एकमत नाही. त्यामुळे मी या अशा गोष्टींचा प्रचार करणे, जाहिरात करणे हे माझ्या आयुष्यात कधीही करणार नाही,” असे रियाने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

“सध्या मला असे वाटते की आम्ही दोघांनी स्वत:ची आणि एकमेकांची काळजी घेतली तर जास्त चांगले होईल. मी हे सर्व लिहिण्यामागचे कारण म्हणजे काही लोक मला वारंवार सांगत आहेत की, मी मूर्ख आहे, मी हा व्रत ठेवावे, लग्न झाल्यानंतरचे हे माझे पहिले व्रत आहे. पण नाही, नको. त्यामुळे तुम्ही आता पुढे जाऊ शकता. तसेच जर तुम्ही हे वाचत असाल तर कृपया या sh*t साठी धन्यवाद. मला आशा आहे की तुम्ही तुमच्या रविवारचा आनंद घ्याल,” असा टोलाही रियाने लगावला.

रिया आणि करणने १४ ऑगस्टला लग्न केले. रिया आणि करण १२ वर्षापासून एकमेकांना ओळखत आहे. रिया आणि करण यांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नाला फार कमी पाहुण्यांनी उपस्थित दर्शवली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Newlywed rhea kapoor says she and karan boolani dont believe in karwa chauth nrp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या