scorecardresearch

उर्फीच्या एक्स बॉयफ्रेंडशी नाव जोडल्यानं संतापली निया शर्मा; म्हणाली, “मी प्रत्येकासाठी उपलब्ध…”

निया ‘अनुपमा’ फेम अभिनेता पारस कालनावतला डेट करत असल्याची चर्चा होती.

उर्फीच्या एक्स बॉयफ्रेंडशी नाव जोडल्यानं संतापली निया शर्मा; म्हणाली, “मी प्रत्येकासाठी उपलब्ध…”
निया पारस कलनावतला डेट करत असल्याची चर्चा होती.

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा तिच्या अभिनयासह बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. निया फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचा संपर्कात असते. ती लवकरच ‘झलक दिखला जा १०’ मध्ये दिसणार आहे. या शोमध्ये ती तिचे डान्स स्किल्स दाखवणार आहे. दरम्यान, सध्या निया शर्माच्या डेटिंगबद्दल चर्चा सुरू आहेत. निया ‘अनुपमा’ फेम अभिनेता पारस कालनावतला डेट करत असून दोघेही ‘झलक दिखला जा १०’ च्या मंचावर त्यांच्या नात्याबद्दल खुलासा करणार आहेत, अशी चर्चा सुरू होती. याच दरम्यान नियाने यावर मौन तोडलंय. तिच्या आणि पारसच्या डेटिंगच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं नियाने म्हटलंय.

कतरिनाची बहीण इसाबेलबरोबर पार्टी करताना दिसला शाहरुखचा लेक आर्यन, फोटो व्हायरल

निया शर्माने पारस कालनावतसोबत डेटिंगच्या बातम्या फेटाळून लावत ती सिंगल असल्याचे सांगितले. याबद्दल ती म्हणाली, “आम्हा दोघांना शोसाठी विचारण्यात आलं होतं. त्यानंतर मी ‘झलक दिखला जा १०’च्या स्टेजवरच पारस कालनावतला भेटले. शोच्या पहिल्याच दिवशी आणि प्रोमो शूटच्या दिवशी मी पारसला मोठ्या उत्साहात भेटले. मी लगेच त्याला ‘हाय बॉयफ्रेंड’ म्हटलं आणि त्याने मला ‘हाय निया’ असं उत्तर दिलं.

KCB: यंदा ‘या’ प्रश्नांची उत्तरं न आल्याने स्पर्धकांनी सोडला खेळ; यापैकी किती उत्तरं तुम्हाला माहितीये?

निया शर्मा पुढे म्हणाली, “मी वाचलं की आम्ही दोघं डेट एकमेकांना डेट करतोय. म्हणजे जर मी सिंगल आहे, तर त्याचा अर्थ असा नाही की माझं नाव कुणाशीही जोडायचं. मी सिंगल आहे, पण प्रत्येकासाठी उपलब्ध नाही.”

अभिनयासोबत खेळातही A1; दीपिका वडिलांप्रमाणे बॅडमिंटनमध्ये मास्टर तर रणबीर फुटबॉलमध्ये, बरीच मोठी आहे ही यादी

दरम्यान, उर्फी जावेद आणि पारस कलनावत काही वर्षांपूर्वी एकमेकांना डेट करत होते. दोघेही एकमेकांवर प्रेम करायचे, पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. ही लहानपणाची चूक होती, कारण त्यावेळी आम्ही दोघे खूप लहान होतो, असं उर्फी म्हणाली होती. मेरी दुर्गामध्ये पारस आणि उर्फी यांनी भूमिका केल्या होत्या. त्यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये आले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nia shamra got angry after her name linked with urfi javed ex paras kalnawat hrc

ताज्या बातम्या