Tum Bewafa Ho: निया शर्मा आणि अर्जुन बिजलानीच्या ‘तुम बेवफा हो’ सॉंगचा यूट्यूबवर धुमाकूळ

30 लाख पेक्षाही जास्त व्ह्यूव्स

Niya-Arjun-Tum Bewafa Ho

टीव्ही क्षेत्रातील ‘हॉट अ‍ॅण्ड ब्यूटीफुल’ अभिनेत्री आणि ‘जमाई राजा 2.0’ फेम निया शर्मा ही तिच्या हॉटनेसमुळे कायमच इंटरनेटवर चर्चेत राहते. आता निया तिच्या नव्या अल्बम सॉंग ‘तुम बेवफा हो’ मुळे चर्चेत आलीय. या अल्बम सॉंगमध्ये निया टीव्ही क्षेत्रातीलच ‘हॅंडसम’ अभिनेता अर्जुन बिजलानी सोबत दिसून येतेय. अर्जुन आणि नियाचं हे ‘तुम बेवफा हो’ सॉंग खूपच इमोशनल आहे. दोघांचं हे नवं अल्बम सॉंग काल रिलीज करण्यात आलं. हे गाणं रिलीज होताच या गाण्याने युट्यूबवर धुमाकूळ घातलाय.

निया शर्मा आणि अर्जुन बिजलानीचं हे इमोशनल सॉंग सध्या खूपच गाजत आहे. काल हे सॉंग रिलीज केल्यानंतर या गाण्याला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. केवळ २४ तासांत या गाण्याला जवळजवळ ३० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहीलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

निया आणि अर्जुनचं हे गाणं स्टेबिन बेन आणि पायल देव यांनी गायलं आहे. तर या गाण्याचे बोल कुणाल वर्मा यांनी लिहिले आहेत. या गाण्याच्या संगीतबद्दल सांगायचं झालं तर पायल देव यांनी या गाण्याला संगीत दिलेलं आहे. अगदी इमोशनल करून सोडणारं हे गाणं प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. या गाण्यातील निया आणि अर्जूनची जोडी प्रेक्षकांच्या मनात बसली आहे.

अर्जून बिजलानीच्या वर्कफ्रेंटबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत छोट्या पडद्यावर नागिन’, ‘इश्क में मरजवा’ सारख्या मालिकांमध्ये लीड रोल केलेले आहेत. तर नियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने २०१० मध्ये ‘काली – एक अग्निपरीक्षा’ मालिकामधून टीव्ही क्षेत्रात डेब्यू केला होता. त्यानंतर ती ‘एक हजारों में मेरी बहना है’, ‘जमाई राजा’, ‘इश्क में मरजावां’, ‘नागिन’ यासारख्या मालिकांमधून घराघरांत पोहोचली. सोबतच नियाने रोहित शेट्टीच्या अ‍ॅडव्हेंचर रिअ‍ॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी-मेड इन इंडिया’ चा खिताब देखील आपल्या नावावर केलाय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nia sharma and arjun bijlani tum bewafa ho emotional music video released on youtube prp

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या