प्रियांकासाठी निकनं खरेदी केलं तब्बल ४७ कोटींचं घर

निकनं एखाद्या राजकुमारीचा महाल सजवावा तसं हे घर प्रियांकासाठी सजवलं आहे.

प्रियांका आणि निक जोनास २ डिसेंबरला जोधपूर येथे विवाहबंधनात अडकणार असल्याचं समजत आहेत. मात्र दोघांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे लग्नाची तारीख पुढे जाण्याची शक्यता आहे.

‘देसी गर्ल’ प्रियांकासाठी तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं आलिशान घर खरेदी केलं आहे. प्रियांका आणि निक नोव्हेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. तेव्हा आपल्या होणाऱ्या बायकोसाठी स्वप्नवत महाल निकनं खरेदी केला आहे. या आलिशान घराची किंमत तब्बल ४७ कोटींहून अधिक असल्याचं म्हटलं जात आहे.

निकनं काही महिन्यापूर्वी हे घर खरेदी केलं होतं. प्रियांकाच्या वाढदिवशी निकनं तिला लग्नाची मागणी घातली. त्याआधीच त्यानं तिच्यासाठी हे घर भेट म्हणून खरेदी केलं होतं. कॉलिफोर्नियामधल्या बेवर्ली हिल्स परिसरात हे घर आहे. बेवर्ली हिल्समध्ये हॉलिवूडमधल्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची घरं आहेत. तर याच परिसरात अनेक पंचतारांकित हॉटेल्स देखील आहेत. म्हणूनच प्रियांकाला आवडेल अशा सुंदर ठिकाणी निकनं हे घरं खरेदी केलं आहे. साडेचार हजार स्वेअर फिटचं हे आलिशान घर असून त्यात ५ बेडरुम्स, स्विमिंग पूल आणि अनेक आधुनिक सोयीसुविधा देखील आहे. निकनं एखाद्या राजकुमारीचा महाल सजवावा तसं हे घर प्रियांकासाठी सजवलं आहे.

सध्या प्रियांका न्यूयॉर्कमधल्या ३० पार्क प्लेस या आलिशान इमारतीत राहते. न्यूयॉर्कमधलं हे सर्वात महागडं आणि आलिशान ठिकाण आहे. ८३ मजल्याच्या या उत्तुंग इमारतीतून संपूर्ण न्यूयॉर्क शहर नजरेस पडतं. लग्नानंतर प्रियांका आणि निक जोनास बेवर्ली हिल्स मधल्या त्यांच्या नव्या घरात राहायला जाणार आहेत.

प्रियांका आणि निक जोनास २ डिसेंबरला जोधपूर येथे विवाहबंधनात अडकणार असल्याचं समजत आहेत. मात्र दोघांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे लग्नाची तारीख पुढे जाण्याची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nick jonas buys a house for fiance priyanka chopra

ताज्या बातम्या