scorecardresearch

Premium

बॉलिवूड गाण्यांवर डान्स करायला का आवडतं? निक जोनसने दिले मजेशीर कारण, पाहा ‘हा’ मजेशीर व्हिडीओ

निक जोनसचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

nick jonas, priyanka chopra,
निक जोनसचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Photo Credit : Nick Jonas fallontonight Instagram/ Priyank Chopra The Kapil Sharma Show)

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)  आणि अमेरिकी सिंगर निक जोनस (Nick Jonas)  यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. प्रियांका आणि निक नुकतेच आई-वडील झाले आहेत. प्रियांका आणि निक दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. निक सध्या एका डान्स रिअॅलिटी शोचा परिक्षक आहे. तर नुकतीच निकने एका मुलाखतीत बॉलिवूड गाणं आणि डान्सवर असलेल्या त्याच्या प्रेमाविषयी सांगितले आहे.

आणखी वाचा : “अचानक १५० लोक मध्येच घुसले आणि…”, शरद पोंक्षेनी सांगितला होता ‘मी नथुराम गोडसे…’ नाटकाच्या प्रयोगाचा तो थरारक प्रसंग

Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
mrinal kulkarni virajas and shivani
“शिवानी आणि विराजस, तुम्ही दोघेही…,” मृणाल कुलकर्णींनी व्यक्त केला आनंद, जाणून घ्या खास कारण

निकने ‘द जिमी फॉलन’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी चर्चा करत असताना म्हणाला, “माझी पत्नी भारतीय आहे. आम्ही अनेक बॉलिवूड गाण्यांवर नाचतो. बॉलिवूड गाण्यांवर डान्स करणं सगळ्यात सोपं आहे असं मला वाटतं कारण तिथे फक्त मला ही स्टेप करावी लागते. मी बसलो असेन किंवा उभा असेन काही फरक पडत नाही. तुम्हाला फक्त ही एकच स्टेप करायची असते”, असं निक म्हणाला.

आणखी वाचा : “विकीच्या जागी कोणी दुसरा असता…”, सुशांतच्या मृत्युनंतर आलेल्या अनुभवावर अंकिता झाली व्यक्त

आणखी वाचा : “मी सलमान खानला कधीच घेतल नसतं कारण…”, ‘मुळशी पॅटर्न’च्या हिंदी रिमेकवर प्रवीण तरडेंच वक्तव्य चर्चेत

निकने बॉलिवूडमधील गाण्यांवर प्रेम व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी महिनाभर आधी इन्स्टाग्राम लाइव्ह दरम्यान, त्याचं आवडतं बॉलिवूड गाणं हे बॉम डिग्गी डिग्गी आहे, असं सांगितलं आहे. प्रियांका चोप्रा अॅमेझॉन प्राइम सीरीज ‘सिटाडेल’साठी शूटिंग करत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nick jonas dances on bollywood songs with wife priyanka chopra singer said on jimmy fallon show dcp

First published on: 07-06-2022 at 12:59 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×