प्रियांकाआधी निक ‘या’ मिस युनिव्हर्सला करत होता डेट

२०१४ मध्ये निकनं त्याच्या नात्याची कबुली दिली होती. पण २०१५ मध्ये या दोघांच्या नात्यात कायमचा दुरावा आला.

प्रियांका चोप्रा – निक जोनास

निक जोनास आणि प्रियांका चोप्रा या दोघांच्या प्रेमाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. प्रियांकानंही इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करून अप्रत्यक्षरित्या निकसोबतच्या तिच्या नात्याला दुजोरा दिला आहे. पण प्रियांकाला डेट करण्यापूर्वी निकचं नाव मिस युनिव्हर्स ऑलिव्हिया क्युल्पोसोबत जोडलं गेलं होतं.

२०१२ साली मिस युनिव्हर्स स्पर्धेचा किताब ऑलिव्हियानं पटकावला होता. ऑलिव्हिया ही २६ वर्षांची आहे. मिस युएसए सौंदर्यस्पर्धेत निकची ओळख ऑलिव्हियासोबत झाली होती. तेव्हापासून हे दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. २०१४ मध्ये निकनं त्याच्या नात्याची कबुली दिली होती. पण २०१५ मध्ये या दोघांच्या नात्यात कायमचा दुरावा आला.

ऑलिव्हियाला डेट करण्याआधी निक ऑस्ट्रेलियन गायिक डेल्टा गॉर्डेमनलाही डेट करत होता. पण वर्षभरातच या दोघांचं ब्रेकअप झालं होतं. काही महिन्यांपूर्वी डेल्टानं निकशी संपर्क साधून सारं काही निट करण्याचा प्रयत्नदेखील केला होता. मात्र प्रियांकावर माझं प्रेम असल्याचं सांगत निकनं तिला नकार कळवला होता. ऑलिव्हिया आणि डेल्टाबरोबरच निकचं नाव मायली सायरस, सेलेना गोमेझ यांसारख्या सेलिब्रिटींसोबत जोडलं गेलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nick jonas dated a miss universe olivia culpo before dating priyanka

ताज्या बातम्या