बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. अवघ्या महिनाभरापूर्वी प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गुडन्यूज दिली. आई-बाबा बनल्यानंतर प्रियांका आणि निक या दोघांनीही सोशल मीडियावरुन ब्रेक घेतला होता. यानंतर आता ते दोघेही सोशल मीडिया सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. निकने बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस ही नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असते. निकने तब्बल १७ दिवसांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने हिरव्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. या व्हिडीओ त्याच्या हातात कॉफीचा कप असल्याचे पाहायला मिळत आहे.

What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
IPL 2024 Kolkata Knight Riders vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: स्वप्नातही आरसीबीला हरवण्याचा विचार करणाऱ्या गंभीरनेच केलं विराटच्या संघाचं कौतुक, पाहा नेमकं काय म्हणाला
salman khan reaction on shahrukh khan song
Video: घरावरील हल्ल्यानंतर सलमान खान दुबईत, शाहरुख खानचं गाणं वाजताच भाईजानने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक

या रिल व्हिडीओत एक महिला निकला विचारते की ‘सकाळी उठल्यावर कसं वाटतं?’ त्यावर निक कॅमेऱ्याकडे पाहतो आणि ‘चला एक चांगला दिवस बनवूया’, असे म्हणतो. हा व्हिडीओ शेअर करताना निकने त्याला छान कॅप्शन दिले आहे. ‘मॉर्निंग मूड’ असे कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिले आहे.

दरम्यान यापूर्वी प्रियांकाने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले होते. हे ‘मिरर सेल्फी’ तिने तिच्या गाडीत बसून काढले होते. यातील एका फोटोत तिने सनग्लासेस वापरले आहेत. या फोटोला तिने हटके कॅप्शन दिले आहे. ‘प्रकाश चांगला वाटतो’, असे तिने यात म्हटले आहे. आई झाल्याची घोषणा केल्यानंतर तब्बल १२ दिवसांनी तिने सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

“मला वेळ द्या…”, अर्जुन कपूर आणि मलायकाच्या लग्नावर अरबाज खानने सोडले मौन

प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आई झाल्याची माहिती दिली. तिने सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला आहे. “आम्ही सरोगसीच्याद्वारे एका बाळाचे स्वागत केले आहे” असे प्रियांकाने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी प्रियांका पहिल्यांदा एका मॅगझिनच्या कव्हर फोटोवर झळकली होती.