‘तू मला दिसत नाहीस’; आकाशाकडे बघत भावाच्या आठवणीत निक्की झाली भावूक

तिची ही पोस्ट चर्चेत आहे.

nikki tamboli

रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १४’मधून स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री निक्की तांबोळीच्या भावाचे करोनामुळे निधन झाले. निक्कीचा भाऊ जतिन तांबोळी हा २९ वर्षांचा होता. भावाच्या निधनानंतर निक्की सोशल मीडियावर भावाच्या आठवणीत पोस्ट शेअर करताना दिसते. नुकताच तिने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे.

निक्की लवकरच ‘खतरों के खिलाडी ११’मध्ये दिसणार आहे. त्यासाठी ती केपटाउनला रवाना झाली आहे. दरम्यान तिने इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. हा आकाशाचा फोटो शेअर करत ती भावूक झाली आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘तू मला दिसत नाहीस’ असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील बापूजींनी गायले किशोर कुमार यांचे गाणे, व्हिडीओ व्हायरल

खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होण्यापूर्वी निक्कीने सांगितले होते की तिच्या भावाची इच्छा होती तिने या शोमध्ये सहभागी व्हावे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. ‘मी माझ्या आयुष्याच्या अशा वळणावर आहे जिथे एकीकडे माझे कुटुंबीय कठिण काळातून जात आहे आणि दुसरीकडे माझ्या कामाच्या कमिटमेंट’ असे तिने म्हटले होते.

४ मे रोजी निक्की तांबोळीचा भाऊ जतिन तांबोळीचे निधन झाले. तो २९ वर्षांचा होता. त्याला टीबी, न्यूमोनिया आणि करोना झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nikki tamboli missing her late brother jatin tamboli shared emotional post avb

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या