बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बॉलीवूड अभिनेता आमिर खान याच्या ‘पीके’ चित्रपटाला दहा पैकी दहा गुण देत चित्रपट केवळ मनोरंजन करणार नसून ‘पीके’ने जागरूकता निर्माण करण्याचे काम केले असल्याचे मत नोंदविले.
नितीश कुमार म्हणाले की, “आमिरच्या ‘पीके’ चित्रपटाला गुण द्यायचे झाल्यास हा चित्रपट दहा पैकी दहा गुण देण्यास पात्र आहे. कारण, या चित्रपटातून समाजात सकारात्मक संदेश देण्याचे काम करण्यात आले आहे.”
पीके चित्रपटला जितका चित्रपटगृहात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याबरोबरच या चित्रपटाविरोधात गेल्या काही दिवसांपासून काही धर्मिक संघटनांनी निषेधाचा सुर आळवला आहे. पीकेला विरोध करणाऱयांवर टीका करताना नितीश कुमार म्हणाले की, पीकेला संपूर्ण भारतात सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि हा चित्रपट नागरिकांच्या ज्ञानात भर टाकण्याचे काम करत आहे. अशा दृष्टीने याकडे पाहणे गरजेचे आहे.