scorecardresearch

Premium

‘प्रिती झिंटाने पाच अटी लादल्याचे वृत्त असत्य’

माजी प्रियकर आणि व्यावसायिक भागीदार नेस वाडियाविरुद्ध जून महिन्यात पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने पाच अटी…

‘प्रिती झिंटाने पाच अटी लादल्याचे वृत्त असत्य’

माजी प्रियकर आणि व्यावसायिक भागीदार नेस वाडियाविरुद्ध जून महिन्यात पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने पाच अटी घातल्याच्या वृत्तात सत्यता नसल्याचे वाडिया समूहाच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले. मरिन ड्राईव्ह पोलीस स्थानकात दाखल केलेल्या लेखी तक्रारीत ३० मे रोजी वानखेडे स्टेडियमवर आयपीएल सामन्यादरम्यान नेस वाडियाने आपल्याशी गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचे अभिनेत्री प्रितीने म्हटले होते. अटीच्याबदल्यात तक्रार मागे घेण्याची चर्चा दोन्ही पक्षात झालेली नसल्याचे सांगत, या केवळ अफवा असून, त्यात काही तथ्य नसल्याचे वाडिया समूहाचा प्रवक्ता म्हणाला. दरम्यान, नेस वाडियातर्फे या प्रकरणी बोलाविण्यात आलेल्या नवीन चार साक्षीदारांनी त्या दिवशी दोघांमध्ये सर्व काही नेहमीप्रमाणेच होते असे सांगितल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

Neeraj Chopra Furious After Asian Games Controversy Says I had To Throw Seven Times Neera Chopra Gold Medal Throw Video
“मला ७ वेळा थ्रो करायला लागला..”,नीरज चोप्राचा ‘गोल्डन’ थ्रो नंतर संताप; म्हणाला, “माझ्यामुळे बाकीच्यांना..”
Celebrity Cricket Turns Fight Angry Actors Producers Beat Each Other Six Injures Actress Spotted Crying Video Make Cricket Fans Mad
सेलिब्रिटी क्रिकेटच्या मैदानात गदारोळ; कलाकारांची हाणामारी, अभिनेत्री रडली.. Video पाहून लोकांचा संताप
kangana-abu-salem
कंगना रणौत कुख्यात गँगस्टर अबू सालेमसह? व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ फोटोवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया चर्चेत
onkar bhojne
“मी त्याचा फॅन, त्याला भेटण्यासाठी…” ओंकार भोजनेने सांगितला प्रसिद्ध अभिनेत्याबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्सा

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: No truth in preity zintas five conditions story ness wadias spokesperson

First published on: 05-09-2014 at 07:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×