“ओढणी गळ्याभोवती घट्ट बसली होती अन् माझा श्वास…”; नोराने सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव

नोराने बॉलिवूडमध्ये स्वबळावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची डान्सर आणि अभिनेत्री म्हणून नोरा फतेहीला ओळखलं जाते. नोराने बॉलिवूडमध्ये स्वबळावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या नोराचे ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटातील ‘कुसू कुसू’ हे गाणे चांगलेच व्हायरल होत आहे. मात्र या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान नोराला तिच्या करिअरमधील सर्वात वाईट अनुभवाला सामोरे जावे लागलं, असा धक्कादायक खुलासा तिने केला आहे.

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ‘कुसू कुसू’ हे गाणे काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले. सध्या हे गाणे सुपरहिट ठरत आहे. या गाण्यामधील नोरा फतेहीने केलेला डान्स पाहण्यासारखा आहे. मात्र आतापर्यंत तिने केलेल्या अनेक डान्समधील सर्वात वाईट अनुभव तिला आला, असे तिने म्हटले आहे. “या गाण्यातील एक ड्रेसमुळे माझा श्वास गुदमरत होती. आतापर्यंतच्या आयुष्यात तिला आलेला हा सर्वात वाईट अनुभव होता,” असे ती म्हणाली.

नोराच्या मते, “या गाण्यात माझ्या बॉडीसूटसोबत असलेली ओढणी ही गळ्याभोवती बांधण्यात आली होती. त्यासोबत माझ्या डोक्यावर असलेल्या मुकूटाचे वजन फार जास्त होते. ती ओढणी माझ्या गळ्याभोवती घट्ट बसली होती. त्यामुळे माझा श्वास गुदमरत होता. यादरम्यान माझ्या गळ्याभोवती अनेक जखमाही झाल्या. अनेकदा शूटींगच्या सेटवर गुडघ्यांवर खरचटणं, पाय रक्तबंबाळ होणे यासारख्या किरकोळ घटना घडत असतात. मात्र या गाण्यादरम्यान घडलेला हा सर्व प्रकार माझ्यासाठी सर्वात वाईट अनुभव होता. या ड्रेससोबतची ओढणी जड असल्यामुळे ती गळ्याभोवती अडकली होती,” असे तिने सांगितले.

“त्यावेळी मला असं वाटत होतं की माझी मान कोणीतरी दोरीने बांधली आहे आणि मला जमिनीवर ओढत आहे. त्यावेळी आमच्याकडे शूटिंगसाठी फार कमी वेळ होता. म्हणून मी गाण्याचे शूटींग सुरु ठेवले. त्यानंतर ब्रेक घेतला.” असे ती म्हणाली.

‘सत्यमेव जयते 2’मधील नवे गाणे प्रदर्शित, नोरा फतेहीचा बोल्ड अंदाज

दरम्यान, ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलाप झवेरी करत असून जॉनसोबतच अभिनेता मनोज बाजपेयीदेखील स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच दिव्या खोसला कुमार, मनोज बाजपेयी, अनूप सोनी, हर्ष छाया हेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ‘सत्यमेव जयते 2’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सत्यमेव जयतेचा पुढचा भाग आहे.

पाहा व्हिडीओ :

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nora fatehi calls shooting for kusu kusu her worst experience on set nrp

ताज्या बातम्या